Home भंडारा वर्धा जिल्ह्यातील उपासक -उपासिका यांनी पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहाराला दिली भेट

वर्धा जिल्ह्यातील उपासक -उपासिका यांनी पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहाराला दिली भेट

203

आशाताई बच्छाव

Screenshot_20231014-173121_WhatsApp.jpg

वर्धा जिल्ह्यातील उपासक -उपासिका यांनी पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहाराला दिली भेट

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) आज दिनांक 14 ऑक्टोंबर 2023 ला वर्धा जिल्ह्यातील सेलू तहसील मधील सिंधी रेल्वे येथील बौद्ध उपासक आणि उपासिका यांनी भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात गोसेखुर्द धरणाला लागून असलेल्या शांतीवन बौद्ध विहार पाथरी चिचाळ येथे भेट दिली . येथील नैसर्गिक दृश्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्यदिवे पुतळा ,तथागत गौतम बुद्ध यांचे विहार, सम्राट अशोक यांचे विहार ,पिंपळ वृक्ष खाली असलेले विहार, सार्वजनिक वाचनालय बघून त्यांना प्रसन्नता दिसून आली .या ठिकाणी पाणी, राहण्याची सुविधा, सुद्धा त्यांना दिसून आली .त्यामुळे त्यांनी आम्ही या विहाराला भेट दिली .आपण सुद्धा या विहाराला भेट देऊन या विहाराचे महत्त्व जाणून घ्यावे असे त्यांनी पत्रकार संजीव भांबोरे यांच्याशी बोलताना व्यक्त केले . यावेळी भेट देणाऱ्यांमध्ये ताराबाई पाटील ,ललिता कस्तुरे ,कल्पना कस्तुरे, सुजाता भगत ,सेजल भगत, तनवी कस्तुरे, प्रेमीला कस्तुरे ,महानंदा कस्तुरे, वैशाली पाटील ,रोहिणी पाटील ,उपस्थित होते.

Previous articleवर्धा जिल्ह्यातील उपासक -उपासिका यांनी पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहाराला दिली भेट
Next articleशांतीवन बुद्ध विहार पाथरी चिचाळ येथे 67 वा धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.