Home बुलढाणा पाच दिवसांचा आठवडा; पण अधिकारी, कर्मचारी येईना वेळेवर

पाच दिवसांचा आठवडा; पण अधिकारी, कर्मचारी येईना वेळेवर

24
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220514-WA0030.jpg

पाच दिवसांचा आठवडा; पण अधिकारी, कर्मचारी येईना वेळेवर

ब्यूरो चिफ स्वप्निल देशमूख सह
ज्ञानेश्वर पाटील दांदळे
(तालुका विशेष प्रतिनिधी संग्रामपूर)

संग्रामपुर :- शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा केला असला तरी कर्मचारी कार्यालयात वेळेवर उपस्थित राहत नाहीत
संग्रामपूर तहसिल, कार्यालयांमध्ये तुरळक कर्मचारी वगळता अनेक जण कार्यालयात गैरहजर होते. विशेष म्हणजे पातुर्डा मंडळ अधिकारी हरिभाऊ उकर्डे यांच्याकडे नव्यानेच प्रभारी नायब तहसीलदार म्हणून अतिरिक्त पदभार मिळाला, परंतु ते स्वतःला मिळालेल्या पदाचा गैरवापर करत असल्याचे दिसून येत आहे. त्यांना मिळालेल्या प्रभारी नायब तहसीलदार मुळे त्यांची अतिरिक्त “दादागिरी” वाढल्याचे दिसून येते, त्यामुळे ते तहसील कार्यालयात न थांबता अवैध रेती वाल्यांच्या मागे “चिरी मिरी” करता तालुक्यात फिरताना दिसतात. त्यामुळे प्रभारी नायब तहसीलदार हरिभाऊ उकर्डे यांची खुर्ची मात्र जास्त वेळ रिकामीच दिसते. आणि तहसील कार्यालयात सुद्धा काही वेळ बसल्यास त्याठिकाणी सुद्धा तालुक्‍यातील अवैध वसुली करणारे त्यांचे संगडी “फर्जी कोतवाल” त्यांच्यासोबत बसलेले दिसतात, एवढेच नाही तर त्या ठिकाणी उकर्डे हे त्यांच्या कार्यालयात सर्वसामान्यांच्या कामाकडे दुर्लक्ष करत तेथे आलेल्या फर्जी कोतवाल चा फक्त आदर सत्कार करण्यात मात्र कुठं कमी पडत नाहीत हे तेवढेच खरे. याकडे मात्र वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज भासते या आधी “फर्जी कोतवाल चालवतो महसूल विभागाचा कारभार” असे वृत्त *युवा मराठा न्यूज* मध्ये प्रकाशित झाले होते. त्यामुळे कर्तव्यदक्ष तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी तात्काळ मीटिंग बोलावून तालुक्यातील सर्व कोतवालांची माहिती घेतली व यापुढे फर्जी कोतवाल दिसु नाही. परंतु त्यांच्या आदेशाला सुद्धा केराची टोपली दाखवल्याचे समजते प्रभारी नायब तहसीलदार उकर्डे यांच्या संगनमताने तहसील कार्यालय हेच फर्जी कोतवालाचा हंड्डा बनला आहे.
हे ही तेवढेच खरे . वरिष्ठांचा आदेशाला सुद्धा उकर्डे हे मानत नसल्यामुळे “मेरी मुर्गी एक ही टांग” अशा उकर्डे यांच्या वागणुकीमुळे तहसील कार्यालयातील यांची खुर्ची मात्र बरेच वेळा रिकामीच दिसते.त्यामुळे तालुक्यातील विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना तहसील कार्यालय येथून आपल्या अर्जावर मार्किंग न मिळाल्यास पदसिद्ध अधिकारी हजर नसल्यास आल्या पावली परत जावे लागते, ‌ शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार राज्यातील शासकीय कार्यालयांना पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय शासनाने ता.१२ फेब्रुवारी रोजी घेतला. त्याची अंमलबजावणी ता.२९ फेब्रुवारीपासून केली जात असून प्रत्येक आठवड्यात शनिवारी व रविवारी कार्यालयांना सुटी असणार आहे.
पाच दिवसांचा आठवडा करताना शासनाने कर्मचाऱ्यांना दररोजच्या कामकाजात ४५ मिनिटांचा वेळ वाढविला असून सकाळी नऊ पंचेचाळीस ते सायंकाळी साडेसहा यावेळेत कर्मचाऱ्यांनी कार्यालयात हजर राहणे आवश्यक आहे. शनिवारपासून या आदेशाची अमंलबजावणी झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आनंदात सुट्टीचा मजा लुटली. परंतू हे कर्मचारी कार्यालयात येण्याची वेळ मात्र विसरले कर्मचारी गैरहजर होते. तालुक्यातील शासकीय कार्यालयातील अनेक कर्मचारी बाहेर तालुक्यातून येणे-जाणे करतात. त्यामुळे हे कर्मचारी सततच सकाळी अकरानंतर कार्यालयात येत असतात. त्यामुळे यांना पाच दिवसाचा आठवडा केला. तरी यांच्या कामकाजावर काहीही परिणाम झालेला नाही. अशा लेटलतीफ कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here