Home माझं गाव माझं गा-हाणं पिंगळवाडे येथे ग्राम बाल विकास केंद्राची सुरुवात.

पिंगळवाडे येथे ग्राम बाल विकास केंद्राची सुरुवात.

363
0

राजेंद्र पाटील राऊत

पिंगळवाडे येथे ग्राम बाल विकास केंद्राची सुरुवात.
सटाणा,(शशिकांत पवार तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)                                      महाराष्ट्र शासन यांचा कुपोषणमुक्त अभियान अंतर्गत पिंगळवाडे येथे मीरा मोठभाऊ पवार या लाभार्थ्याच्या घरी योग्य तो पोषक व सकस आहाराचे वाटप एकात्मिक बालविकास प्रकल्प (1)चे अधिकारी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाने पिंगळवाडे येथे मीरा मोठाभाऊ पवार या लाभार्थ्यास ग्रामपंचायत पिंगळवाडे यांच्या अर्थसहाय्याने लाभार्थ्याच्या घरीच बाळ कोपरा नामक व्यवस्था तयार करण्यात आली आहे त्या लाभार्थ्यास सकस व पौष्टिक आहाराचे नियमित वाटप चालू आहे. जेणेकरून त्या लाभार्थीचे लवकरात लवकर वजन व उंची वाढण्यास मदत होईल व ते बाळ सुदृढ होईल. या अनुषंगाने या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत पिंगळवाडे यांनी योग्य तो निधी उपलब्ध करून दिला तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सरपंच सौ लताबाई केदा भामरे हे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी ताहाराबाद बिटाचे कर्तव्य दक्ष पर्यवेक्षिका सौ सी.बी.अहिरे यांनी मोलाचे सहकार्य केले व तसेच लाभार्थ्याच्या घरी स्वतः भेट दिली व पालकांना या केंद्राची माहिती व फायदे समजावून सांगितले या कार्यक्रमासाठी कार्यकर्ती श्रीमती सुनंदा बच्छाव व मदतनीस सौ. अनिता भामरे हे आपले कर्तव्य बजावत आहेत

आगामी काळात बागलाण 1व 2 मध्ये कुपोषणाचा आकडा हा शून्यावर राहिल अशी मला अपेक्षा आहे व या कमी आम्ही सदैव तत्पर आहोत , जाधव साहेब
बाल विकास प्रकल्प अधिकारी बागलाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here