राजेंद्र पाटील राऊत
सटाणा – (शशिकांत पवार तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
डॉ.भारती पवार यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने उत्तर महाराष्ट्राला केंद्रात नेतृत्वाची संधी मिळाली आहे.
मोदी सरकारमधील मंत्रिमंडळातील जम्बो मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून चार चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे त्यात कोकणातून नारायण राणे यांना व डॉ. भागवत कराड यांना कॅबिनेट मंत्री तर डॉ. भारती पवार व कपिल पाटील यांना केंद्रीय राज्यमंत्रिपदी संधी दिली आहे. या सर्वांमध्ये डॉ. भारती पवार या अवघ्या दोन वर्षातच त्यांच्या अभ्यासपूर्ण कौशल्य शैली ,संसद भवनात शेतकऱ्यांबाबत चे असलेले प्रश्न पोटतिडकीने मांडून वरिष्ठांना ,पक्षश्रेष्ठींना स्थानिक जनतेच्या समस्यां वेळोवेळी लक्षात आणून दिले, याचबरोबर कांदा निर्यात असो की द्राक्ष अशा प्रश्नांबरोबरच आदिवासी जनतेच्या समस्या अशा अनेक प्रश्नांना वाचा फोडून भारतीय जनता पक्षाच्या अवघ्या दोन वर्षातच विश्वासू ठरलेल्या भारती पवार या एकमेव खासदार म्हणाव्या लागतील त्यांच्या या मतदार संघातील कर्तव्यदक्षता, कार्यतत्परता , कार्यकर्ते व जनतेशी असलेला गोड संवाद त्याचप्रमाणे वेळप्रसंगी अधिकाऱ्यांनाही खडे बोल बोल सुनावणाऱ्या खासदार त्या ठरल्या आणि या गोष्टींचा फायदा त्यांना मंत्री पदापर्यंत पोहोचू शकला. एक आदिवासी कुटुंबातून आलेल्या सर्वसामान्य महिलेला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यामुळे सर्वत्र डॉ.
भारती पवार यांचे स्वागत होत आहे. त्यांचे सासरे दिवंगत माजी आदिवासी विकास मंत्री ए .टी .पवार यांचा प्रशासनाचा दांडगा अनुभव डॉक्टर भारती पवार यांना मतदार संघात काम करताना कामी आला. एक सर्वसामान्य कुटुंबातील रेल्वे कर्मचारी ची मुलगी आज केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री झाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. सामाजिक विश्लेषक रवींद्रकुमार जाधव यांनी मागील महिन्यात राजकीय कानोसा सदराखाली केलेले लिखाण सत्यतेत उतरले असून त्यांनी डॉ.
भारती पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळेल असे सांगितले होते त्याचप्रमाणे त्याची कारणमीमांसा व कोणत्या कोणत्या मंत्र्यांना व खासदारांना डावलले जाऊ शकते हे देखील लिहिले होते आणि आज ते खरे ठरले त्यामुळे सामाजिक विश्लेषक रवींद्रकुमार जाधव यांच्या ” कानोसा” लेखाचा देखील पक्षश्रेष्ठींनी दखल घेतली असेच म्हणावे लागेल.
डॉ.भारती पवार यांच्या रूपाने मोदी सरकारने उत्तर महाराष्ट्राला मंत्रिपदाचा असलेला अनुशेष भरून न्याय दिला आहे. डॉ.
भारती पवार यांचे मंत्री पदी पदी निवड झाल्याबद्दल कार्यकर्त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी एकमेकांना पेढे भरून आनंद व जल्लोष साजरा केला.
डॉ.भारती पवार यांचा जीवन पट
सासरचे नावं- भारती प्रवीण पवार
शिक्षण-.एम..बी. बी .एस
सासरे _स्व.ए. टी. पवार, माजी आदिवासी मंत्री_
माहेरचे नाव भारती किसन बागुल
तिरहळ तालुका कळवण जिल्हा नाशिक
वडील स्वर्गीय .किसन बागुल , सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी
आई शांताबाई गृहिणी
भाऊ प्रकाश किसन बागुल , ओएनजीसी मुंबई येथे नोकरी
पती प्रवीण अर्जुन( ए. टी.) पवार
एक मुलगा एक मुलगी
23 मे 2019 ला दिंडोरी मतदारसंघातून खासदार




