Home अमरावती मेळघाटात भरला आदिवासींचा पारंपरिक थाट्या बाजार, ढोलकी-बासरीच्या सुरात रंगले नृत्य.

मेळघाटात भरला आदिवासींचा पारंपरिक थाट्या बाजार, ढोलकी-बासरीच्या सुरात रंगले नृत्य.

85
0

आशाताई बच्छाव

IMG_20231118_060820.jpg

मेळघाटात भरला आदिवासींचा पारंपरिक थाट्या बाजार, ढोलकी-बासरीच्या सुरात रंगले नृत्य.
————
दैनिक युवा मराठा
पी एन
देशमुख.
अमरावती विभागीय संपादक.
अमरावती-(चिखलदरा मेळघाट)
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील चिखलदरा आदिवासींची संस्कृती वेगळीच आहे. त्यांचे वेगळे असे अवकाश आहे. आदिवासी कोरकू समाजात होळी हा सर्वात महत्त्वाचा असला तरी मेळघाटातील गायकी गोल्ड बांधव दिवाळी पर्वावर गुरांसोबत खेळण्यापासून तर बासरी ढोलकीच्या तालावर नृत्य करून दिवाळी सण साजरा करतात. दिवाळीच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू झालेल्या या पर्वात बुधवारी चूरणी व गुरुवारी काट कुंभ येथे थाट्या बाजार भरला. मेळघाटात गुरख्याला थाट्या म्हणतात. गायकी गोंड समाज बांधव वर्षभर गावातील गुरे चारण्याचे काम करतात. मोबदल्यात पशुपालक कडुन ठरलेला वार्षिक विहार असतो. त्यावर त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक डोलारा चालतो. दिवाळी सणाच्या पर्वावर मेळघाटच्या तांड्यामध्ये ढोलकी व बासरी च्या स्वरात थाटाने थिरकणारे पाय व गावकऱ्यांची साथ उत्साहात भर घालणारी असते. कोरोनामुळे या उत्साहावर विजन पडले होते. गावात गोंधळी काढून दिवाळी सण साजरा करतात. गावातील गुराढोरांची चराई करीत असल्याने या मुक्या प्राण्यांचा गायकी गोंड बांधवांना किंवा प्रेम करत असतो. दिवाळीच्या दिवशी पशुपालकाच्या घराच्या भिंतीवर सुनामी रंगून घेऊन गोंधणी काढली जाते. त्या गुरांना थाट्याकडून खिचडा खाऊ घातला जातो. मोबदल्यात काही पशुपालकाकडून त्यांना सुपात घरातील धान्य देण्याची प्रथा आजही आहे. दिवाळीच्या पाच दिवसात थाट्या गावातील गुरे करायसाठी नेत नाही. हे विशेष कोरडा, कोयलारी, कोटमी, डोमा, बगदरी, काजल डोहा, बाबा देही आधी गावात या प्रथेला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गावातून गुराखी ढोलकी बासरीच्या तालात नाच गाणी करतात. त्याला गेरू असे म्हणतात. यानंतर चिखलदरा तालुक्यात भरणाऱ्या मोठ्या आठवणी बाजारात थाट्या बाजाराची धूम सुरू आहे. या बाजारात मोठ्या संख्येने हे समाज बांधव एकत्र येऊन नाद घाणेकर करतात. मेळघाटची ही परंपरा बदलत्या संस्कृतीत आजही सुरू आहे. गुरुवारी काटकुम येथे बाजारात थाट्याचे नाच गाणे रंगले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here