Home जालना एक डिसेंबरला होणाऱ्या सभेच्या पुर्व नियोजनासाठी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा...

एक डिसेंबरला होणाऱ्या सभेच्या पुर्व नियोजनासाठी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाची बैठक संपन्न 

54
0

आशाताई बच्छाव

IMG_20231118_061249.jpg

एक डिसेंबरला होणाऱ्या सभेच्या पुर्व नियोजनासाठी
मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाची बैठक संपन्न
जालना (दिलीप बोंडे) ः मराठा समाजाला आरक्षण मिळावे या लढाईसाठी जिवाची पर्वा न करता लढणारे मराठा आरक्षणाचे संघर्षयोद्धे मनोज जरांगे पाटील यांची शुक्रवार दि. 1 डिसेंबर 2023 रोजी होणाऱ्या भव्य सभेच्या पुर्व नियोजनासाठी शहरातील मातोश्री लॉन्स, अंबड रोड येथे सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा  जालना जिल्हा यांची शनिवार दि. 18 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी  11 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले असून समन्वयक, डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, प्राध्यापक, व्यावसायिक, शेतकरी युवक बांधव, विविध सामाजिक संघटना, प्रतिष्ठीत व्यक्ती, कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाने केले आहे.
या बैठकीला समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे तसेच सर्व आठही तालुक्यातील स्वयंसमन्वयक यांनी जास्तीत जास्त संख्येने या बैठकीला उपस्थित राहुन आप-आपल्या सुचना कळवाव्या तसेच पुढील नियोजन समजुन घ्यावे. तसेच या सभेच्या अनुषंगाने सर्व नियोजनाचे जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करावा असे आवाहन देखील सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्च्या जालना जिल्हयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous articleमेळघाटात भरला आदिवासींचा पारंपरिक थाट्या बाजार, ढोलकी-बासरीच्या सुरात रंगले नृत्य.
Next articleशांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ )येथील ध्यानसाधना व व्यक्तिमत्त्व विकास धम्म शिबिराचे समापन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here