• Home
  • देगलूर तालुक्यातील मरखेल येथे रक्तदान शिबिर संपन्न झाला

देगलूर तालुक्यातील मरखेल येथे रक्तदान शिबिर संपन्न झाला

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201212-WA0104.jpg

देगलूर तालुक्यातील मरखेल येथे रक्तदान शिबिर संपन्न झाला दिनांक 12 डिसेंबर रोजी देगलूर तालुक्यातील मरखेल येथे रक्तदान शिबिर संपन्न झाला. या रक्तदान शिबिरामध्ये ग्रामीण भागातील 70 तरुण-तरुणींनी आपले रक्तदान करून माणुसकीचे दर्शन घडून दिले आहे .देगलूर तालुक्यातील मरखेल येथील सरवदे ग्राम विकास फाऊंडेशन संचलित माझं मरखेल माझा अभियान या उपक्रमाअंतर्गत जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .या शिबिरासाठी डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथील शासकीय रक्तपेढीचे डॉ.ऋषिकेश व इतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात रोपट्याला पाणी टाकून भारतीय संविधानाचे प्रस्ताविकाचे वाचन करून करण्यात आले. या रक्तदानासाठी मरखेल व परिसरातील तरुणांनी व मरखेल पोलिस स्टेशन मधील कर्मचारी सहभाग घेऊन रक्तदान करण्यात आले होते.(संजय कोकेंवार युवा मराठा न्युज नेटवर्क नांदेड)

anews Banner

Leave A Comment