Home नांदेड रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंचेली फाट्या जवळ चोरट्यांनी १ लाख ६६ हजार...

रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंचेली फाट्या जवळ चोरट्यांनी १ लाख ६६ हजार रुपयांचे दागिने पळविले आज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्ह्याची नोंद.

153

आशाताई बच्छाव

Screenshot_20220620-072439_Google.jpg

रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंचेली फाट्या जवळ चोरट्यांनी १ लाख ६६ हजार रुपयांचे दागिने पळविले आज्ञात चोरट्याच्या विरोधात
गुन्ह्याची नोंद.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
खानापूर ता. देगलूर येथील रहिवासी असलेले एकाच कुटुंबातील महिला व पुरुष मंडळी नांदेड येथून वलीमाचा कार्यक्रम संपवून मध्यरात्री घराकडे परत येत असताना रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या कुंचेली फाट्या जवळ चोरट्यांनी सदरच्या कुटुंबाचा ऑटो आडवून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने व चांदीच्या दागिन्यासह दोन ते तीन मोबाईल असा एकूण १ लाख ६६ हजार रुपयाचा मुद्देमाल पळविल्याची घटना दिनांक १९ जून २०२२ रोजीच्या मध्यरात्री कुंचेली फाट्यावर घडली असल्यामुळे सदरची घटना कळताच रामतीर्थ ठाण्याचे पोलीस तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. पण तोपर्यंत चोरट्यांनी तेथून पलायन केले

देगलूर तालुक्यातील मौजे खानापूर येथील रहिवासी असलेल्या एकाच कुटूंबातील महिला व पुरुष मंडळी नांदेड येथे एका वलीमाच्या कार्यक्रमाला गेले होते ते घरा कडे परत येत असताना मॅजिक ऑटोला आडविले आणि दहशत निर्माण करीत धार धार चाकूचा धाक दाखवीत महिलाच्या अंगावर असलेले सोन्याच्या दागिन्या बरोबर चांदीचे ही दागिने पळविले आणि तीन मोबाईल सुद्धा आज्ञात चोरट्यानी घेऊन पलायन केले असल्याचे ठाण्याचे सपोनि विजय जाधव यांनी सांगितले यातील कुटुंब प्रमुख जमील खान अहमद खान पठाण रा. खानापूर ता. देगलूर यांनी रामतीर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अज्ञात आरोपी चोरट्याच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव हे करीत आहेत.

Previous articleआम्ही मा.नरेंद्रजी मोदी यांच्या अग्नीपथ चे समर्थन करतो हिंसापथ चे नाहि
Next articleसंग्रामपूर तालुक्यात दहावी चा निकाल ९६.३४टक्के आठ शाळांचा १०० टक्के निकाल.१५०३ विद्यार्थी उत्तीर्ण.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.