• Home
  • १५ जूनपासून कडक लँकडाऊन ? महापालिका आयुक्त!…

१५ जूनपासून कडक लँकडाऊन ? महापालिका आयुक्त!…

🛑 १५ जूनपासून कडक लँकडाऊन ? महापालिका आयुक्त!… 🛑
✍️ पुणे( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ शहरातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन बाधित (कंटेन्मेंट) आणि सूक्ष्मबाधित क्षेत्रांची नव्याने रचना करण्यात येणार आहे. त्यात दोन्ही क्षेत्रांतून काही परिसर वगळण्यात येतील; तर नवे परिसरही जोडण्यात येतील, असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी शनिवारी स्पष्ट केले.

यासंदर्भातील आदेश येत्या सोमवारी (ता.15) काढण्यात येणार आहेत.
दरम्यान, दुकाने बंद आणि उघडण्याबाबत कोणताही नवा निर्णय नसेल, हे मात्र गायकवाड यांनी आर्वजून सांगितले. त्यामुळे शहरातील सद्य:स्थितीतील व्यवहार सुरळीत राहणार असल्याचे स्पष्ट आहे.
गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून, शनिवारी रात्रीपर्यंत हा आकडा सव्वानऊ हजारापर्यंत पोहोचला होता. जुन्या बाधित क्षेत्रांसोबत त्याबाहेरही रुग्ण वाढत आहेत. या पार्श्‍वभूमीवर खबरदारी म्हणून बाधित आणि सूक्ष्मबाधित भाग आखून त्याठिकाणी उपाय करण्यात येणार आहेत.

तेव्हाच, ज्या भागांतील रुग्ण कमी झाल्या आहेत; तो परिसर वगळण्यात येणार आहे. त्यामुळे तेथील व्यवहार सुरळीत होण्यास मदत होणार आहे. परंतु, सध्या ज्या भागांत रुग्ण सापडेल, तो परिसर सील करण्यापेक्षा रुग्ण राहात असलेल्या घराचा भाग हा सूक्ष्मबाधित म्हणून जाहीर केला जाणार आहे, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

शहरात येत्या सोमवारपासून म्हणजे, 15 जूनपासून कडक लॉकडाउन अमलात येणार आहे, या चर्चेला मात्र महापालिका आयुक्त शेखर गावकवाड यांनी पूर्णविराम दिला. तुर्तास नव्याने कोणतेही निर्णय घेतले जाणार नाहीत.

मात्र, रुग्ण संख्येचा आढावा घेऊन स्थानिक पातळीवर काही उपाय करण्यात येणार आहेत. ज्यामध्ये बाधित आणि सूक्ष्मबाधित भागांचा समावेश राहणार आहे. त्याशिवाय नवे उपाय करण्यात येणार नाहीत, हेही गायकवाड यांनी सांगितले.⭕

anews Banner

Leave A Comment