• Home
  • तुकाराम मुंढे केले ‘ टॅग’ ! आदित्य ठाकरे झाले ‘ रिअँक्ट

तुकाराम मुंढे केले ‘ टॅग’ ! आदित्य ठाकरे झाले ‘ रिअँक्ट

🛑 तुकाराम मुंढे केले ‘ टॅग’ !
आदित्य ठाकरे झाले ‘ रिअँक्ट🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नागपूर :⭕ लॉकडाऊनच्या काळात महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी मार्चपासूनच शहरातील नद्यांची स्वच्छता करण्याचे काम हाती घेतले. त्यामुळे गेल्या दोन महिन्यात नाग नदीचे रुप पालटले. नाग नदी स्वच्छतेचे चित्रिकरण करण्यात आले. त्यातून नाग नदीचे सौंदर्य अनेकांच्या चर्चेचा विषय बनला. स्वत: मुंढे यांनी हा व्हीडीओ ट्‌विटरवर ‘शेअर’ करत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनाही ‘टॅग’ केले. केवळ तासभरातच आदित्य ठाकरेही या मुद्यावर ‘रिअॅक्ट’ झाले.

शहरातील नाग नदीची स्वच्छता दरवर्षी करण्यात येते. यंदा मात्र नाग नदीचे पात्र केवळ रुंदच नव्हे तर खोलही करण्यात आल्याने यावेळी पावसाळ्यात पावसाचे पाणी किनाऱ्यावरील नागरिकांच्या घरापर्यंत जाण्याऐवजी थेट शहराबाहेर वाहून जाईल.
नागपूरची संस्कृती जपण्याचा आणि नदीचे किनारे पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध करण्याचा प्रयत्न महानगरपालिकेने नदी स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने सुरू केला आहे. नाग नदीची स्वच्छता मोहिम ही त्याचाच एक भाग आहे. खोलीकरण व रुंदीकरण करताना काढलेला गाळ नदीच्या संरक्षण भिंतीशी न साठवता तो इतरत्र पाठविण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षी पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती कमी झाल्याचादावा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी फेसबुकवरील आपल्या पोस्टमधून केला आहे. स्वच्छता तर झाली, आता नाग नदीचे सौंदर्य वाढविण्याचे काम सुरू झाल्याचे महापालिका आयुक्तांनी नमुद केले आहे…⭕

anews Banner

Leave A Comment