• Home
  • धारणी अत्याचार प्रकरणी पोलिसांचा अक्षम्य हलगर्जीपणा’ ; चित्रा वाघ

धारणी अत्याचार प्रकरणी पोलिसांचा अक्षम्य हलगर्जीपणा’ ; चित्रा वाघ

‘धारणी अत्याचार प्रकरणी पोलिसांचा अक्षम्य हलगर्जीपणा’ ; चित्रा वाघ

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

दि. २२- संबधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा धारणी पोलिसांना विसर पडला असून ‪अमरावती जिल्ह्यातील धारणी बलात्काराचे प्रकरण‬ ‘सामूहिक’ असतांना चुकीची कलमे लावण्यात आली. शिवाय
पीडित ‪महिला दलित असतानाही ॲट्रोसिटीचे कलम लावले गेले नाही. ‬या ‪गंभीर प्रकरणात पोलिसांनी अक्षम्य हलगर्जीपणा केला असून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करा’, अशी मागणी केली आहे.

संवेदनशील प्रकरणात पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे दिली असून आरोपींना वाचवण्याचा पोलीस करत आहेत. त्यामुळे ‪धारणी पोलीस निरीक्षक मोहन डुले, तपास अधिकारी, कान्होपात्रा, उपनिरीक्षक आकाश महल्ले यांना तात्काळ बडतर्फ करा.

धारणी सामूहिक बलात्कार प्रकरणात ‪सगळ्यात संतापजनक बाब‬ म्हणजे अत्यवस्थ पिडीतेला पोलिसांनी घरी सोडायला हवे होते. पण त्यांनी तिला घरी न सोडता ‘आमच्याकडे पीडितेला घरी सोडायचा नियम नाही’, असे धक्कादायक उत्तर ‪उपनिरीक्षक महल्ले ‬यांनी दिले हि संवेदनशीलता आहे का पोलिस दलाची ????
महल्ले यांचे वर्तन खाकीला काळीमा फासणारे आहे.’

‬धारणीतील गंभीर प्रकाराची दखल राज्याच्या पोलीस महासंचालकांनी तात्काळ घ्यावी, बेजबाबदार वर्तन आणि हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हावी.

anews Banner

Leave A Comment