Home माझं गाव माझं गा-हाणं डॉ नूतन आहेर यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन

डॉ नूतन आहेर यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन

151
0

राजेंद्र पाटील राऊत

डॉ नूतन आहेर यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन
देवळा (युवराज देवरे युवा मराठा न्यूज नेटवर्क)
दि.२१ सप्टेंबर रोजी वाखारी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या डॉ.नूतन आहेर यांनी वाखारी जिल्हा परिषद गटातील काचने हे गाव दत्तक घेतले होते त्याची पालकत्वाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडत काचणे हे गाव कनकापूर ग्रुप ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट असल्याने या दोन्ही गावात अनेक विकास कामे पूर्ण करत त्यांनी विक्रम प्रस्थापित केला अशी भावना डॉ. नूतन आहेर यांच्या हस्ते झालेल्या विविध कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन प्रसंगी स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील(गोटुआबा) आहेर हे उपस्थित होते. लोकार्पण व भूमिपूजन यात प्रामुख्याने सिमेंट बंधारा, जि. प. शाळा व उपकेंद्र इमारत दुरुस्ती, पाणीपुरवठा, कांचन किल्ल्याचे पाणी कनकापूर (वडाळे) पाझर तलावात वळविणे, विविध ठिकाणी सौर पथदीप, भूमिगत गटार, समाज मंदिर व स्मशानभूमी संरक्षक भिंत इत्यादी कामांचा समावेश आहे सदर कार्यक्रमाप्रसंगी
ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी व युवक मित्र मंडळ यांच्या वतीने डॉ.नूतनताई आहेर यांना डॉक्टरेट सन्मान प्राप्त झाल्याने त्यांचा सत्कारही करण्यात आला, यावेळी सरपंच श्रावण आप्पा, उपसरपंच ॲड तुषार शिंदे, चेअरमन नामदेव शिंदे, महारु अण्णा, श्रीराम अण्णा, लखा आप्पा, कौतिक शिंदे, अशोक शिंदे, माणिक शिंदे, गोविंद बर्वे, संतोष शिंदे, भास्कर शिंदे, सतीश शिंदे, कैलास महाले, नामदेव हेंबाडे, जिभाऊ हेंबाडे, बापू आघाव, कारभारी बाबा, शिवाजी पवार, श्रावण पवार, निवृत्ती शिंदे, संजय जैन, नितीन शिंदे, योगेश शिंदे, सोनू शिंदे, बबन शिंदे, दादाजी बर्वे, देवराम पवार, सुरेखा शिंदे, ग्राम विस्तार अधिकारी जयश्री आहेर आदी उपस्थित होते.

Previous article२२ सप्टेंबर २०२१ मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात!!
Next articleग्रामपंचायतींची वीज बिले राज्य सरकार भरणार..! राज्यसरकार ग्रामपंचायतींसाठी दयावान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here