राजेंद्र पाटील राऊत
कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाला जनतेच्या सहकार्याची गरज – डॉ. मीनलताई खतगावकर
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
कोरोनाची दुसरी लाट अकल्पित आणि खूप भयावह आहे. या लाटेने समाजातील अनेकांचे बळी घेतले आहेत. आरोग्य विभागातील कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना संकटात अहोरात्र कार्यरत आहेत. कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करणे एकट्या आरोग्य विभागाला शक्य होणार नाही. त्यासाठी समाजाच्या सर्व क्षेत्रातील जनतेने आरोग्य विभागाला सहकार्य करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन जि.प. सदस्या डॉ. मीनलताई पाटील खतगावकर यांनी केले. त्या रामतीर्थ येथे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यानंतर आयोजित रुग्ण कल्याण समितीच्या बैठकीला संबोधित करताना बोलत होत्या.
रामतीर्थ प्राथमिक आरोग्य केंद्रात चिटमोगरा आणि अटकळी ही उपकेंद्रे असून या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत परिसरातील हिप्परगामाळ, किनाळा, रामतीर्थ, बिजूर, कामरसपल्ली, चिटमोगरा नवीन, चिटमोगरा जुना, बोरगाव, केरुर, अटकळी, टाकळी, आळंदी ही गावे येतात. या गावातील ग्रामस्थांकडून गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णवाहिकेची मागणी केली जात होती. ती विद्यमान जि. प. सदस्या डॉ. मीनलताई पाटील खतगावकर यांच्या परिश्रमाने साकारली. दिनांक 18 मे रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी उपलब्ध झालेल्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आणि रुग्ण कल्याण समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. रामतीर्थ गटाच्या जि. प. सदस्या डॉ. मीनलताई पाटील खतगावकर यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर रुग्ण कल्याण समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत परिसरातील ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संदर्भात विविध प्रश्न विचारले. याप्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस आनंदराव बिरादार, माधव कंधारे, लालू शेट्टीवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणपत वाडेकर यांनी विचार मांडले. याप्रसंगी पुढे बोलताना डॉ. मीनलताई खतगावकर म्हणाल्या की, गेल्या कांही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या घटत चालल्याचे दिसून येत आहे. देशातील कोरोना बाधितांची संख्या तीन लाखांच्या आत आली आहे. असे असले तरी कोरोना अद्याप संपलेला नाही. कोरोना संपला असे समजून नागरिकांनी बेफिकीरपणे वागू नये. कोरोना काळात घालून देण्यात आलेले निर्बंध सर्वांनी पाळावेत. विनाकारण घराबाहेर पडू नये, कोरोना प्रतिबंधक लसीच्या संदर्भात करण्यात येणा-या अपप्रचाराला बळी न पडता स्वतःचा जीव वाचविण्यासाठी कोरोनाची लस जरूर घ्यावी.
याप्रसंगी बाळासाहेब पाटील खतगावकर, पंचायत समिती सभापती सुंदरबाई पाटील, पंचायत समिती सदस्य मोहन पाटील, माजी पंचायत समिती सभापती प्रतिनिधी लालू शेट्टीवार, सरपंच मनिषाताई तोडे, उपसरपंच जयश्रीताई देगलूरे, सरपंच विठ्ठल माने, डॉ.विवेक बोरसे, डॉ.मनीषा कोल्हे, मारुती अहिरे, हनमंतराव तोडे, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड हणमंत पाटील वाडेकर,माधव कंधारे, अवकाश पाटील, माधव वाघमारे,शेषराव रोकडे, सरपंच तिरुपती डाकोरे, उपसरपंच संतोष दासवाड, संतोष पुयड, सुधाकर पांचाळ, आरोग्य कर्मचारी, नागरिक व पत्रकार उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आरोग्य कर्मचारी एम. एस.वाघमारे यांनी केले.