Home जळगाव शासन आपल्या दारी प्रधान मंत्री मातृ वंदना योजना नव्या स्वरूपात लागू :...

शासन आपल्या दारी प्रधान मंत्री मातृ वंदना योजना नव्या स्वरूपात लागू : योजनेची अंमलबजावणी होणार आरोग्य विभागामार्फत

205

आशाताई बच्छाव

IMG-20230606-WA0053.jpg

शासन आपल्या दारी

प्रधान मंत्री मातृ वंदना योजना नव्या स्वरूपात लागू

: योजनेची अंमलबजावणी होणार आरोग्य विभागामार्फत

जळगाव, नरेश पाटील:-  केंद्रीय महिला बाल विकास विभागाच्या दि. १४ जुलै, २०२२ च्या मिशन शक्ती मार्गदर्शक सूचनेनुसार तसेच अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा, पुणे यांचे दि. १९ मे २०२३ च्या पत्रानुसार प्रधान मंत्री मातृ वंदना योजना नव्या अटींसह लागू करण्यात आली आहे.

प्रधान मंत्री मातृ वंदना योजनेचे उद्दिष्ट गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना या अवस्थेमुळे मिळणारी मजुरी कमी होण्यामुळे होणाऱ्या नुकसानीची आंशिकरित्या भरपाई मिळावी, जेणेकरून पहिल्या बाळाच्या जन्मापूर्वी आणि नंतर पुरेशी विश्रांती घेण्यास प्रोत्साहन मिळेल. हा लाभ दोन टप्प्यात रु. ५००० (अक्षरी रु. पाच हजार) चा प्रदान केला जाईल. आणि जर दुसरे अपत्य मुलगी झाले तर मुलीविषयीच्या वर्तणुकीत सकारात्मक बदल होण्याकरिता एकाच टप्प्यात रु. ६००० चा लाभ देण्यात येणार आहे.

गर्भवती माता व स्तनदा मातांना कुटुंबातील पहिल्या जीवित अपत्यासाठी या योजनेअंतर्गत गर्भवती माता व स्तनदा मातांना काही निकष पूर्ण केल्यानंतर २ टप्प्यात रू. ५००० (अक्षरी रु. पाच हजार) तर दुसरी मुलगी झाल्यानंतर एका टप्प्यात ६००० (रु. सहा हजार) चा लाभ थेट लाभार्थीच्या आधार संलग्न (सीडेड) बँक खात्यात जमा केला जातो. मात्र वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना किंवा सार्वजनिक उपक्रमातील महिलांना तसेच सध्या लागू असलेल्या कोणत्याही कायद्याने सामान लाभ मिळत असल्यास या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.

एखाद्या लाभार्थीस दुसऱ्या गरोदरपणात जुळं/तीळ किंवा चार अपत्य झाले असतील आणि त्यापैकी एक मुलगी किंवा अधिक मुलगी असेल तरी दुसऱ्या मुलीसाठीचा लाभ अनुज्ञेय आहे.

 

Previous articleनाट्यगृह, प्रेक्षागृहांच्या खासगीकरणाचा डाव हाणून पाडू.- आयुक्‍तांना संभाजी ब्रिगेडचा निवेदनातून इशारा.
Next articleभारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.