Home जळगाव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

100
0

आशाताई बच्छाव

IMG-20230606-WA0054.jpg

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव, नरेश पाटील : सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेवू शकत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यापैकी इयत्ता ११ वी व १२ वी तसेच इयता १० व १२ वी नंतरच्या व्व्यावसायिक तसेच बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध स्तरांवरील महाविद्यालयात/शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या मागासवर्गीय शासकीय वसतीगृहातील मुलां मुलींप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर स्वाधार योजना सुरु केली आहे. सन २०२३-२४ या वर्षासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरीता अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत. असे आवाहन योगेश पाटील, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

सन २०२१-२२ मध्ये जळगाव जिल्ह्यातील ४७१ विद्यार्थ्यांना एकूण ६० लाख सत्तर हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. पात्र विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी भोजनभत्ता 25 हजार रुपये, निवासभत्ता 12 हजार रुपये, निर्वाहभत्ता 6 हजार रुपये देण्यात येतो. याव्यतीरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी रुपये पाच हजार व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी रुपये दोन हजार इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येते.

अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांचे कार्यालयात मोफत उपलब्ध आहे. आवश्यक कागदपत्राच्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here