Home सामाजिक वास्तव जीवनात संघर्षाचे चटके सोसून पत्रकारितेच्या यशोशिखरावर पोहचलेल्या श्रीमती आशाताई बच्छाव

वास्तव जीवनात संघर्षाचे चटके सोसून पत्रकारितेच्या यशोशिखरावर पोहचलेल्या श्रीमती आशाताई बच्छाव

171
0

मालेगाव कार्यालय

IMG-20230609-WA0059.jpg

वास्तव जीवनात संघर्षाचे चटके सोसून पत्रकारितेच्या यशोशिखरावर पोहचलेल्या श्रीमती आशाताई बच्छाव वाचकहो,आज युवा मराठा न्युजपेपर्स अँन्ड न्युज चँनलच्या व्यवस्थापकीय संपादक,आश्रयआशा फाऊंडेशन संस्थेच्या सचिव तथा आमच्या मार्गदर्शक व प्रेरणास्थान श्रीमती आशाताई बच्छाव यांचा आज वाढदिवस! आजच्या वाढदिवसानिमित त्यांच्या जीवनातील काही संघर्षात्मक अडचणींचा व संकटाचा सामना करीत ताईंनी आजवरचा प्रवास कसा केला याचा लेखाजोखा या वाढदिवसानिमित मांडणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो.यशाला व सुखाला आपसुकच खुप सारे नातेसंबध दाखवायला येणारे पुढे असतात,पण दुःखाच्या व संकटाच्या प्रसंगी हेच नातेवाईक पाठ दाखविण्यात धन्यता मानतात हा जगाचा इतिहास आशाताईनी देखील जवळून अनुभवला व बघितला.नाशिकच्या मालेगांवजवळील व-हाणे सारख्या एका खेडेगावाचे नाव आज संपूर्ण महाराष्ट्रात आशाताईच्या उत्कृष्ट नियोजन व व्यवस्थापनामुळे मोठे झाले आहे.सन २००५ पासून आशाताईनी पत्रकारितेत पर्दापण करतानांच “युवा मराठा”ची धुरा आपल्या हाती घेताना “युवा मराठा” त आमुलाग्र असे बदल घडवून आणले आहेत.आशाताईच्या उतम मार्गदर्शनाखाली आज “युवा मराठा”ची चळवळ महाराष्ट्रातल्या सुमारे पंचवीस जिल्ह्यात पोहचली असून,”युवा मराठा”त पंचवीस जिल्ह्यात कार्य करणारे जीवाभावाचे कौटुंबिक सदस्यांसारखे कार्यरत असलेले पत्रकार ख-या अर्थाने या लोकचळवळीचे शिलेदार मावळे आहेत.व-हाणेसारख्या खेडेगावात जन्माला आलेल्या आशाताईनी अनेक संकटाना व दुःखाला सामोरे जाताना स्वतः चा स्वाभिमान कधी गमावला नाही.जिद्द,हिंमत आणि आत्मविश्वासाच्या बळावर आज आशाताईनी पत्रकारितेच्या यशोशिखराला गवसणी घातली आहे.”युवा मराठा”ला स्वतःच्या पोटच्या अपत्याप्रमाणे वाढवितांना ,घडवितांना आशाताईनी प्रसंगी आर्थिक झळही सोसली त्यामुळेच आज “युवा मराठा”चा नावलौकिक सर्वत्र वाढविण्यामागे आशाताईचे कर्तृत्व लाखमोलाचे ठरले आहे.”युवा मराठा”ची सुत्रे हाती घेण्याअगोदर आशाताई या राज्यस्तरीय वृतपत्र सत्यवार्ता (मुंबई ), पोलीस नजर (मुंबई ), कोल्हापूर विशेष (मुंबई ) या वृतपत्रांच्या महिला पत्रकार म्हणून कार्यरत होत्या,निर्भिड व रोखठोक पत्रकारिता करताना आशाताईच्या जीवनात अनेक मान- सन्मानाचे योगही आलेत.मालेगांवच्या तत्कालीन तहसिलदार ज्योती देवरे यांनी आशाताईना सन्मानपत्र देऊन गौरविण्या सोबतच आदर्श महिला पत्रकार म्हणून सन्मानीत केले.पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्य करीत असतानाच आशाताईनी स्वतःच्या गावी व-हाणे येथे आश्रयआशा फाऊंडेशन या संस्थेची स्थापना करुन,आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली.आश्रयआशा फाऊंडेशन या संस्थेच्या आशाताई बच्छाव या स्वतः संस्थापकीय सचिव आहेत.आश्रयआशा फाऊंडेशन संस्थेच्या वतीने स्वतः आशाताई सन २०२० पासून स्वखर्चाने पाणपोई व-हाणे गावात चालवीत आहेत.आश्रयआशा फाऊंडेशन या संस्थेला अगदी थोडयाच दिवसाच्या कार्यकाळात आय.एस.ओ.दर्जा मिळविण्या बरोबरच भारत सरकारच्या निती आयोगाची मान्यता मिळविण्याची कर्तबगारी ताईनी प्रत्यक्षात साकार करुन दाखविली.ताईंच्या आजच्या वाढदिवसानिमित राष्ट्रकार्य म्हणून व-हाणे,कौळाणे (निं.) आणि मालेगांव शहरात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न होत आहे.आशाताईची अगदी सुरुवात पासूनच राष्ट्राप्रती आत्मियता व तळमळ किती प्रखर आहे याची जाणीव त्यांच्या कार्यावरुन होते,कोल्हापूर,सांगली भागात काही वर्षापूर्वी आलेल्या महापूरात संसार उध्वस्त झालेल्या बांधवाच्या मदतीसाठी स्वत आशाताई या मालेगांवच्या रस्त्यावर उतरुन मदतफेरीच्या माध्यमातून पुरग्रस्तांना मदत करण्यात आघाडीवर होत्या. या प्रकारच्या सामाजिक कार्यामुळे आशाताईना कोरोना काळात एकता फाऊंडेशन नागपूर या संस्थेकडून गोल्ड मेडल व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले,त्याशिवाय एडसग्रस्तांसाठी केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून महाराष्ट्र शासनाचे गौरवपत्र देखील देऊन आशाताईचा सन्मानच झालेला आहे. आशाताईचे बालपण अगदी सुखमय व आनंदी वातावरणात गेले.मात्र आशाताईची वैवाहिक स्थिती तशी फारशी समाधानकारक व सुखी नव्हतीच,अनंत संकटे व दुःखाचा सामना करीत आशाताईनी संघर्षाच्या काटेरी वाटेवरुन चालताना अन गरीबीचे चटके सहन करताना ख-या खोटयांची जवळून पारख केली.आशाताईच्या पती निधनानंतर तर अक्षरशः ताईंना अनोखा अनुभव आला.नातेवाईक देखील पाठ दाखवून जसे आम्ही ओळखतच नाही या अर्विभावात आशाताई व त्यांच्या दोन मुलांना कित्येक वर्ष टाळत राहिलीत.पण म्हणतात ना? सत्याचा वाली परमेश्वर असतो…अगदी त्याप्रमाणेच कालपर्यत आशाताईना टाळणारे ओळख न देणारे संधीसाधू नातेवाईकही आता आशाताईचा उदोउदो व मान – सन्मान करुन गौरव करु लागली आहेत.तर हि किमया फक्त आशाताई यांच्या त्यागाची,बहुमोल बलिदानाची आहे.आशाताईनी आपल्या आयुष्याची थोडीथाडकी नव्हे तर तब्बल १८ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात घालवून आपल्या बुध्दीकौशल्याच्या बळावर हि कर्तबगारी सिध्द करुन दाखविली आहे.एक सामान्य गृहिणी ते राज्य पातळीवरील ख-या अर्थाने “युवा मराठा”च्या मार्गदर्शक ,प्रेरणास्थान आणि आधारस्तंभ असलेल्या आशाताईच्या वाढदिवसानिमित लाखामोलाच्या अनमोल शुभेच्छा या शब्दप्रवासातून महाराष्ट्रभरातील “युवा मराठा”परिवाराच्या वतीने बहाल करतो. भास्कर जी.देवरे उपसंपादक दैनिक युवा मराठा

Previous articleभारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
Next articleश्रीमती आशाताईंचा वाढदिवस उत्साहात संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here