Home नाशिक श्रीमती आशाताईंचा वाढदिवस उत्साहात संपन्न

श्रीमती आशाताईंचा वाढदिवस उत्साहात संपन्न

259
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

Screenshot_20230612-202601_WhatsApp.jpg

श्रीमती आशाताईंचा वाढदिवस उत्साहात संपन्न
मालेगांव,(युवा मराठा न्युज नेटवर्क)- युवा मराठा न्युज नेटवर्कच्या व्यवस्थापकीय संपादकीय तथा आश्रयआशा फाऊंडेशन संस्थेच्या संस्थापकीय सचिव श्रीमती आशाताई बच्छाव यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
या वाढदिवस दिनाचे औचित्य साधत कौळाणे,व-हाणे परिसरात आशाताईच्या कार्याचा आढावा असलेला वृतपत्राचा अंक विनामुल्य वाटप करण्यात येऊन व-हाणे गावात आशाताईच्या अभिनंदन व शुभेच्छापर डिजीटल होर्डींग्ज लावण्यात आले होते.या वाढदिवस प्रसंगी व-हाणे गावात आश्रयआशा फाऊंडेशन संस्थेच्या पाणपोई असलेल्या जागेवर व आसपास वृक्षारोपण करण्यात आले.व-हाणे जि.प.मराठी शाळेचे मुख्याध्यापक जाधव, ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हेमंत नरवीर शिरसाठ,आश्रयआशा फाऊंडेशन संस्थेच्या सचिव श्रीमती आशाताई बच्छाव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.युवा मराठाचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत, वृतसंपादक आंशूराज पाटील,विजय चांदणे,विनोद बेडेकर,संतोष पवार व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here