• Home
  • जिल्हा परिषद अध्यक्षा भारती कामडी यांनी केला पदाचा चुकीचं वापर. पालघर जिल्ह्यातील  घटना!

जिल्हा परिषद अध्यक्षा भारती कामडी यांनी केला पदाचा चुकीचं वापर. पालघर जिल्ह्यातील  घटना!

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210303-WA0138.jpg

जिल्हा परिषद अध्यक्षा भारती कामडी यांनी केला पदाचा चुकीचं वापर.
पालघर जिल्ह्यातील  घटना!
बोईसर- तारापूर एमआयडीसीतील ‘बजाज हेल्थ केअर ग्रुप’च्या तीन कंपन्या महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने पाच महिन्यांपूर्वी बंद केल्या होत्या. मात्र, १ मार्चपासून अचानक त्या कंपन्या पूर्ववत सुरु करण्यात आल्या. या विषयी प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा करण्यात आली असता त्यांच्याकडून घकादायक खुलासा समोर आला आहे. पा अधिकाऱ्यांच्या माणण्यानुसार पालघर जिला परिषद अध्यक्षा भारती कामडी यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावाचा दबाव टाकून बजाज हेल्य केअर ग्रुपच्या तिन्ही बंद कंपन्या बजाज हेल्थ केअर एन-१०८, वेट फार्मा ६२, ६३, न्युट्रॉप्सस टी-२० सुरु करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. या त्यांच्या भूमिकेची चर्चा संपूर्ण जिल्ह्याच्या पर्यावरण प्रेमीकडून सुरु आहे. एनजीटी व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आखून दिलेले नियम व शर्ती धाग्यावर बसवून कंपनीचे मालक सजन बजाज, अनिल जैन यांनी प्रदुषण नियंत्रण मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आर्थिक गैरव्यवहार करन बेकायदेशीररित्या तिन्ही कंपन्या सुरु केल्या असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर या विषयी लक्ष देऊन प्रदुषण मंडळाचे सदस्य सचिव अशोक सिंघारे व डॉक्टर यशवंत सोनटक्के यांनी या कंपन्याची पुर्नपाहणी करावी अन्यथा त्यांच्याही कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भारती कामडी यांनी ग्रामपंचायत विभागातील रस्ते, वीज, ग्रामिण शाळा पावर लक्ष केंद्रित करून तेथीत अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मात्र, त्या सोन्याची अंडी देणान्या एमआयडीसी त नाक खुपम् पाहात आहेत, ते त्यांनी करु नये अशी चर्चा जनमाणसांत होऊ लागली आहे.(वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)

anews Banner

Leave A Comment