Home सोलापूर मुख्यमंत्र्यांचे आज विठ्ठलाकडे साकडे माझ्या राज्यातील सर्व जनता तसेच बळीराजा सुखाऊ दे

मुख्यमंत्र्यांचे आज विठ्ठलाकडे साकडे माझ्या राज्यातील सर्व जनता तसेच बळीराजा सुखाऊ दे

28
0

आशाताई बच्छाव

IMG-20220710-WA0027.jpg

मुख्यमंत्र्यांचे आज विठ्ठलाकडे साकडे
माझ्या राज्यातील सर्व जनता तसेच बळीराजा सुखाऊ दे

युवा मराठा न्युज पेपर,वेब पोर्टल प्रतिनिधी रविंद्र शिरस्कार

पंरपरेला जोपासुन दरवर्षी प्रमाणे आज दिनांक १० जुलै ,पंढरपुरात आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीची महापूजा करण्यात आली. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहपरिवार त्यांचे वडील संभाजी, एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता, मुलगा श्रीकांत आणि नातू देखील पूजेसाठी उपस्थित होते.
यांच्यासोबत विधिनुसार विठ्ठल रुख्मिनी यांची महापूजा सकाळी ३ वाजुन १०मिनिटाला पार पडली आहे . त्यावेळी “माझ्या महाराष्ट्र राज्यातील बळीराजा सुखावला पाहिजे. कुठेही पूर परिस्थिती, अतिवृष्टीची दुर्घटना घडू नये, राज्यातील प्रत्येक जाती धर्मातील लोकांसोबत बळीराजाच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे हेच साकडे त्यांनी आज विठ्ठलाकडे घातले,” अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना बोलताना दिली आहे.
ते म्हणाले “मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला आज आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपुरातील विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात होणाऱ्या शासकीय पूजेचा मान मिळाला. पांडुरंगाला सर्वकाही माहित असतं. लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या मंदिराचा विकास झाला पाहिजे, यासाठी मी संबंधित अधिकाऱ्यांना पंढरपुरातील विठ्ठल मंदिर व परिसरातील विकासाचा एक विशेष आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत.”

पंढरपुरात सध्या जवळपास पाच ते सहा लाख भाविक भक्त दाखल झालेत. त्यामुळे चंद्रभागेच्या तीरावर भक्तांचा चोखा मेळा जमलेला आहे. त्यांच्यासाठी सोय म्हणून प्रशासनाने 64 एकर परिसरात राहुट्या उभारल्या आहेत.तसेच या ठिक-ठिकाणी पिण्याचे पाण्याची सोय कलेली असुन, अनेक स्वच्छतागृहे उपलब्ध केलेली आहेत. शिवाय या आषाढीच्या एकादशीला दिवशी कुठलाही अनूचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. प्राप्त महिती नुसार शक्य तोवर साधारण आठवडाभर पंढरपूर अफाट संख्येने भक्तांच्या सानिध्यात असेच गजबजलेले राहणार आहे.

दरम्यान पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की
कालच मी देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री व अन्य प्रमुखांच्या भेटी घेतल्या आहेत, केंद्रातील सर्वांनीच मला राज्यात नवीन नवीन योजना राबवा मोठमोठे प्रकल्प राबवून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करा, तुम्हाला कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे आश्वासन दिल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

Previous articleदापोडी फुगेवाडी कासरवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी माता मंदिरामध्ये आषाढी एकादशी उत्साह साजरी 
Next articleनमन एज्युकेशन संचालित रेनबो इंटरनेशनल स्कूल मध्ये आषाढी एकादशी सोहळा उत्साहात संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here