Home जळगाव अँटी करप्शन ब्यूरो, जळगाव चा यशस्वी सापळा, लाचखोर लेखा अधिकाऱ्यास रंगेहात लाच...

अँटी करप्शन ब्यूरो, जळगाव चा यशस्वी सापळा, लाचखोर लेखा अधिकाऱ्यास रंगेहात लाच घेताना अटक.

113
0

आशाताई बच्छाव

IMG-20230526-WA0096.jpg

अँटी करप्शन ब्यूरो, जळगाव चा यशस्वी सापळा, लाचखोर लेखा अधिकाऱ्यास रंगेहात लाच घेताना अटक.

या सापळ्यातील तक्रारदार पुरुष,वय- ४४
रा.दहीवद ता.अमळनेर, जि.जळगाव. असून यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या मे.सप्तश्रृंगी माता आदिवासी महिला बहुउद्देशीय संस्था, दहिवद, ता.अमळनेर, जि.जळगाव या संस्थेच्या नावे आदिवासी मुलांचे वस्तीगृह (नविन) चोपडा ता.चोपडा या वस्तीगृहास सन-2021-2022 या शैक्षणिक वर्षात वस्तीगृहात लागणारे दैनंदीन भोजनाचा ठेका घेतलेला होता. त्यांनी वर्षभर सदर वस्तीगृहास पुरविलेल्या भोजन ठेक्याचा मोबदला म्हणून पत्नीच्या नावे असलेल्या संस्थेच्या बँक खात्यामध्ये एकुण ७३,००,०००/- रुपये डी.डी. द्वारे अदा करण्यात आलेले आहेत. सदर वर्षभराचे सर्व भोजन ठेक्याचा मोबदला म्हणून एकुण ७३,००,०००/- रुपये बँकेच्या माध्यमातून अदा करून दिल्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष आलोसे रविंद्र भाऊराव जोशी, वय-५७ वर्ष, लेखा अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल. ता.यावल जि.जळगाव. वर्ग-२
रा. नेहरू नगर, मोहाडी रोड, जळगाव, ता.जि. जळगाव. यांनी एकुण ७३,००,०००/- रुपये रकमेच्या अर्धा टक्का प्रमाणे प्रथम ३६,५००/- रुपये व नंतर तडजोडी अंती २०,०००/- रुपये लाचेची मागणी केली व सदर मागणी केलेली लाच रक्कम आलोसे रवींद्र जोशी यांनी स्वतः पंचासमक्ष एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल कार्यालयातील त्यांचे स्वतःचे कक्षात स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. तेव्हा त्यांच्या कडून लाचेची रक्कम सुद्धा हस्तगत करण्यात आलेली असून, त्यांचे वर यावल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

या सापळ्यात पर्यवेक्षण अधिकारी म्हणून श्री.शशिकांत पाटील, पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि. जळगांव. मो.नं. 8766412529. सापळा व तपास अधिकारी म्हणून श्री. एन. एन. जाधव, पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगांव. मो.नं 8691824333 तर सापळा पथक म्हणून पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने. पो.कॉ.सचिन चाटे यांनी काम पाहिले.
ही कार्यवाही करीत असताना कारवाई मदत पथक म्हणून पो. नि. संजोग बच्छाव, ला.प्र.वि. जळगाव, मो.नं 9823128038, स.फौ. दिनेशसिंग पाटील, स.फौ. सुरेश पाटील, पो.हे.कॉ. अशोक अहिरे, पो.हे.कॉ. सुनिल पाटील, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना. जनार्दन चौधरी, पो.ना. किशोर महाजन, पो.ना. सुनिल वानखेडे, पो.ना. बाळु मराठे, पो.कॉ. प्रदिप पोळ, पो.कॉ. अमोल सुर्यवंशी, पो.कॉ. प्रणेश ठाकुर. यांनी काम पाहिले. तर या सापळ्याचे मार्गदर्शक अधिकारी म्हणून 1) मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. मो.नं. 93719 57391, 2) मा. श्री. एन. एस. न्याहळदे साो., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. मो.नं. 9823291148, 3) मा.श्री.नरेंद्र पवार साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. मो.नं. 9822627288 यांचे अनमोल सहकार्य मिळाले, असे या कारवाई चे पर्यवेक्षक शशिकांत पाटील साहेब यांनी सांगितले.
ही सर्व कार्यवाही आलोसे यांचे सक्षम अधिकारी मा.संचालक सो, लेखा व कोषागारे कार्यालय, मुंबई. यांना सर्व माहिती देऊन करण्यात आलेली आहे.
—————————–
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव
@ दुरध्वनी क्रं. 0257-2235477
*@ मोबा.क्रं. 8766412529*
@ टोल फ्रि क्रं. 1064
==================

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here