Home सोलापूर आम आदमी पार्टीची पंढरपूर ते रायगड स्वराज्य यात्रा

आम आदमी पार्टीची पंढरपूर ते रायगड स्वराज्य यात्रा

49
0

आशाताई बच्छाव

IMG-20230526-WA0097.jpg

आम आदमी पार्टीची पंढरपूर ते रायगड स्वराज्य यात्रा

माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

रविवार दिनांक 28 मे पासून ते 6 जून पर्यंत आम आदमी पार्टीची स्वराज्य यात्रा निघणार आहे. भक्ती स्थान असणाऱ्या पंढरपूर पासून 28 मे ला यात्रेला प्रारंभ होऊन शक्तिस्थान असणाऱ्या रायगडावर 6 जून म्हणजेच राज्याभिषेकाच्या दिवशी ही यात्रा पोहोचणार आहे. सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ही यात्रा निघणार आहे. शिक्षण व आरोग्य व्यवस्थित सुधारणा, दिल्ली प्रमाणे लोकाभिमुख सुशासन राबवणे, भ्रष्टाचार मुक्त शासन व्यवस्था, शेतमालावरील निर्यात बंदी कायमस्वरूपी हटवणे, दिवसा वीज पुरवठा सुरळीत करणे अशा विविध मुद्द्यांना जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने ही यात्रा अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आप महाराष्ट्राचे प्रभारी गोपाल इटालिया यांच्या नेतृत्वात ही यात्रा निघणार आहे. सर्व महाराष्ट्रातून आजचे सर्व पदाधिकारी, हितचिंतक व सभासद या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. या यात्रेचा मार्ग पंढरपूर- सोलापूर- टेंभुर्णी- इंदापूर- बारामती- सांगली- पलूस- कोल्हापूर- सातारा- पुणे- पिंपरी चिंचवड- नवी मुंबई- मुंब्रा- पनवेल- पाचाड- रायगड असा असेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प यात्रेत केला जाईल. संकल्प स्वराज्याच्या, ध्यास स्वराज्याचा हे यात्रेचे ब्रीद आहे. या यात्रेत मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here