Home विदर्भ DJ वाजवू दिला नाही म्‍हणून शेगाव शहर पोलीस ठाण्यात राडा!; तोडफोड करून...

DJ वाजवू दिला नाही म्‍हणून शेगाव शहर पोलीस ठाण्यात राडा!; तोडफोड करून पोलिसांना धक्काबुक्की, दोन महिलांसह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

81
0

राजेंद्र पाटील राऊत

DJ वाजवू दिला नाही म्‍हणून शेगाव शहर पोलीस ठाण्यात राडा!; तोडफोड करून पोलिसांना धक्काबुक्की, दोन महिलांसह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शेगाव (ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख यूवा मराठा न्यूज बूलडाणा ) वाढदिवसानिमित्त मध्यरात्रीनंतरही डीजे वाजवणाऱ्यांना पोलिसांनी रोखले. घटनास्थळी पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर जमावाने शेगाव शहर पोलीस ठाण्यात येऊन राडा केला. सामानाची तोडफोड करून कर्तव्यावरील पोलिसांना धक्काबुक्की व शिविगाळ केली. आज, ७ फेब्रुवारीला पहाटे एकच्या सुमारास (मध्यरात्री) ही घटना घडली. याप्रकरणी दोन महिलांसह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, शेगाव एसटी बस डेपोमागील भागात डीजे वाजत असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून पोलिसांना मिळाली. शहरात गस्तीवर असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक गौतम इंगळे हे पथकासह घटनास्थळी गेले. तिथे पोहोचल्यानंतर पोलिसांनी त्यांना डीजे बंद करण्याच्या सूचना केल्या. मात्र त्यावेळी तिथे जमावाने पोलिसांशी हुज्जत घातली. त्यामुळे जमावापैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर एकच्या सुमारास काही जण पोलीस ठाण्यात पोहोचले.

आमच्याविरुद्ध कुणी तक्रार केली, अशी विचारणा त्यांनी स्टेशन डायरीवर कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना केली. पोलीस ठाण्यातील सामानाची तोडफोड करून कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की व शिविगाळ केली. याप्रकरणी आज सकाळी बळवंत चिंतामण बाभुळकर (३१, रा. झाडेगाव, ता. शेगाव), नरेश अर्जुन बाभुळकर (२८), भारत अर्जुन बाभुळकर (३१, दोघे रा. विश्वनाथनगर, शेगाव), सुनील बाबुराव खंडेराव (३०, रा. कारंजा, जि. वाशिम) यांच्यासह दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आज चारही पुरुष आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच आज उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांनी शेगाव शहर पोलीस ठाण्याला भेट देऊन अधिकाऱ्यांची चौकशी केली. तपास ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली नापोकाँ महेंद्र नारखेडे करत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here