Home विदर्भ विवाहित प्रियसीला रात्रीच्यावेळी भेटायला गेलेल्या पोलीसाचा मृत्यू

विवाहित प्रियसीला रात्रीच्यावेळी भेटायला गेलेल्या पोलीसाचा मृत्यू

105
0

राजेंद्र पाटील राऊत

विवाहित प्रियसीला रात्रीच्यावेळी भेटायला गेलेल्या पोलीसाचा मृत्यू  (देवेंन्द्र थोटे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

भंडारा जिल्ह्यातील गणेशपूर गावामधे मध्यरात्रीच्या वेळी आपल्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या फ्लॅटवर गेलेल्या पोलिस शिपायाचा मृत्यू झाल्यानं पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे. मृत्यू झालेल्या पोलीस शिपायाचं नाव महेश डोगरवार असं आहे. महेशची हत्या झाली की, इमारतीतून खाली उतरताना त्याचा मृत्यू झाला, याचा आधिक तपास पोलीस करत आहेत.
रविवारच्या मध्यरात्री पोलीस शिपाई महेश डोगरवार विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या फ्लॅटवर गेला होता. त्यावेळी याची माहिती महिलेच्या पतीला मिळाली. पती रूममध्ये येत असल्याचं पाहून पोलीस शिपाई हा फ्लॅटच्या बालकनितून खाली उतरत असताना त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला व
त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे . परंतु , त्याचा तोल गेल्यामुळे तो खाली पडला की, त्याची हत्या करण्यात आली, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. महेश हा साकोली पोलीस ठाण्यात कार्यरत होता. ही घटना भंडारा शहराला लागून असलेल्या गणेशपूर येथे घडली. भंडारा शहर पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
रविवारी रात्रीच्या सुमारास पोलीस शिपाई त्याच्या विवाहित प्रेयसीला भेटण्याकरता तिच्या फ्लॅटवर पोहोचला. याची कल्पना घरातीलच दुसऱ्या रूममध्ये असलेल्या महिलेच्या पतीसह मुलांना आली. दरम्यान, पतीने यासंदर्भात पत्नीला विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता, मद्यप्राशन केलेल्या पोलिसाने अंतर्वस्त्रांवरच महिलेच्या फ्लॅटच्या बाल्कनीचा वापर करून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, मद्यप्राशन केलेलं असल्यामुळे पोलीस शिपाई महेश डोगरवार याचा तोल गेला आणि तो खाली जमिनीवर कोसळला. डोक्याला मोठ्या प्रमाणावर दुखापत झाल्यामुळे अतिरक्तस्राव झाला आणि पोलीस शिपायाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. भंडारा शहर पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleमराठा नगरमध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
Next articleप्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या शुभेच्छा                   
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here