Home मराठवाडा सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आनंदोत्सव उत्साहात साजरा.

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आनंदोत्सव उत्साहात साजरा.

162
0

राजेंद्र पाटील राऊत

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आनंदोत्सव उत्साहात साजरा.

_________________________

औरंगाबाद बबनराव निकम विभागीय संपादक युवा मराठा वेब न्यूज चॅनल अँन्ड पेपर
_________________________

वैजापूर तालुक्यातील येथील न्यू हायस्कूल तलवाडा येथे बबनराव निकम यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याध्यापक संजय खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आनंदोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
जयंती निमित्त प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन सावित्रीबाई फुले यांच्या जिवन प्रवासावर सखोल सविस्तर भाषणे केली.
याप्रसंगी उपस्थित मान्यवर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या जयंती निमित्ताने इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र लोणी खुर्द यांच्या नियोजित कार्यक्रम नुसार डॉ.गुजाळ , डॉ.कार्तीक कोलते यांच्या पथकाने कोव्हीड १९ लसिकरणाचे डोस यशस्वी रित्या दिले.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक संजय खरात, डॉ.गुजाळ, डॉ.कार्तिक कोलते ,के.एस.नाडगौडा, तुषार शिरसाठ, गंगाधर तोटेवाड, सुरेश गायकवाड, जयप्रकाश पवार, नरेंद्र पोटे, राजेंद्र जोर्वेकर, बबनराव निकम, हसन सैय्यद, यांच्यासह अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगाधर तोटेवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन हसन सैय्यद यांनी केले.

Previous articleराष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाच्या दिनदर्शिकेचे रत्नागिरीमध्ये उत्साही वातावरणात प्रकाशन..
Next articleअंचलगाव शाळेत शिक्षण परिषद
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here