Home सामाजिक मातृतुल्य श्रीमती भारती बोडके मॅडम च्या सोबतीने जीवनाचा मार्ग कळाला

मातृतुल्य श्रीमती भारती बोडके मॅडम च्या सोबतीने जीवनाचा मार्ग कळाला

192
0

आशाताई बच्छाव

IMG-20230824-WA0022.jpg

मातृतुल्य श्रीमती भारती बोडके मॅडम च्या सोबतीने जीवनाचा मार्ग कळाला

ज्ञानदानाच्या पवित्र अशा क्षेत्रात ३६ वर्ष अध्यापनाचे काम करून आज आपल्या प्रदीर्घ सेवेतून सेवा निवृत्त होत असल्याबद्दल अंतकरण गहिवरून आले आहे.
सहकारी नाही तर आईच्या मायेने सदैव पाठीशी उभ्या राहिल्यात, सोबतीने तुमच्या जीवनाचा अर्थ कळाला, मार्गदर्शनातून आत्मविश्वासू बनवले. मायेच्या स्पर्शातून मातृत्वाची भावना निर्माण करून एक जवळचं नातं निर्माण करणा-या बोडके मॅडम यांनी आम्हाला दिलेले प्रेम कधीही न विसरण्यासारखेच आहे.
श्रीमती बोडके मॅडम यांचा निरोप समारंभ अर्थातच त्यांच्या अखंड सेवेचा प्रदीर्घकाळ संपणार आणि म्हणूनच तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल विचार मांडावेसे वाटले. मॅडमच्या आजपर्यंतच्या जीवनावर उजाळा द्यायचा झालाच तर अवघ्या 23 व्या वर्षी एक शिक्षिका म्हणून ज्ञानदानाचे कार्य हाती घेऊन अविरत 36 वर्षांची प्रदीर्घ सेवा करून अखेर सेवापूर्तीचा हा क्षण समोर उभा राहिला .मॅडम चा जन्म 14 ऑगस्ट 1967 या दिवशी बोडके कुटुंबात मखमलाबाद येथे झाला. माहेरची परिस्थिती अतिशय बेताची असल्याने परिस्थितीची जाणीव ठेवून आपण शिक्षण घेणे अत्यंत गरजेचे आहे हे लक्षात घेऊन मॅडमने डी एड पर्यंतचे शिक्षण घेऊन मविप्र संस्थेच्या इगतपुरी या शाखेत नोकरीस प्रारंभ केला. व आपल्या कुटुंबाला हातभार लावला. त्यानंतर सायखेडयातील एका सुशिक्षित कुटुंबातील रमेश कुटे सर यांच्यासोबत श्रीमती बोडके मॅडमचा विवाह झाला.रमेश कुटे सर देखील संस्थेत कार्यरत असल्याने एकाच क्षेत्रातील या दोन्ही दांपत्यांचा संसार अतिशय आनंदात सुरू झाला.श्रीमती बोडके मॅडम कोठुरे येथे तर कुटे सर निफाड कॉलेजमध्ये सलग वीस वर्षे कार्यरत होते. एवढ्या मोठ्या संस्थेत सलग एवढी वर्षे एकाच ठिकाणी काम करण्याची संधी मिळणे ही खरंतर त्यांच्या कामाचीच पावती त्यानंतर आपल्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने योग्य म्हणून ते नाशिकला स्थायिक झाले .तेव्हा मॅडम कुंदेवाडीत व सर के टी एच एम कॉलेजमध्ये कार्यरत होते.श्रीमती बोडके मॅडमचा सहवास मला कुंदेवाडी च्या शाखेतच लाभला. त्यांच्या अनुभवांची शिदोरी मोकळ्या हाताने आम्हा नवोदित शिक्षकांच्या झोळीत टाकायला मॅडमने कधीच मागे पुढे पाहिले नाही. कधी एक मार्गदर्शक, कधी आईच्या मायेने तर कधी मैत्रीण बनून नेहमी आधार देऊन जीवनातील संघर्षाला घाबरून न जाता लढत राहण्याची उभारी देत आम्हाला बळ दिले सलग तेरा वर्षे श्रीमती बोडके मॅडमचा सहवास लाभल्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. त्यानंतर माझी बदली झाली पण काहीही अडचण आल्यास पटकन डोळ्यांसमोर येतो तो मॅडमचा च चेहरा. कारण आत्मविश्वास असायचा की त्याच योग्य मार्ग दाखवणार मॅडम तुमच्या या निर्मळ स्वच्छ मायाळू स्वभावामुळेच आज तुमचे कुटुंब सुखी समाधानी असून तुमची दोन्ही मुले स्थिर स्थावर आहे. व तुम्ही देखील अगदी आनंदात आपला संसार सांभाळत ज्ञानदानाचे कार्य आजतागायत चालू ठेवले.तुमचाच आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आम्ही वाटचाल करीत सेवा करण्याचा निश्चित प्रयत्न करू आणि तुम्ही दिलेला कान मंत्र मी आयुष्यभर लक्षात ठेवीन.तो म्हणजे अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात असतात त्यामुळे अडचणी देवाला सांगत बसू नका ,तर अडचणींना सांगा- देव माझ्या पाठीशी आहे. मात्र श्रीमती बोडके मॅडम यांच्या सेवापुर्ती सोहळ्यास माझ्या आहेर कुटुंबीयांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा व त्यांचे भावी आयुष्य सुखाचे, समाधानाचे व भरभराटी जावो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना–

सौ शारदा आहेर
जनता विद्यालय शिरवाडे (वाकद)

Previous articleरामनगर ते दहिवड बससेवा सुरू
Next articleवारकरी मंच महाराष्ट्र राज्य विदर्भ विभाग कार्याध्यक्षपदी हभप केशव महाराज भुजाडे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here