Home भंडारा आजच्या मॉडर्न युगात युवतींनी सजग राहावे- ॲड. महेंद्र गोस्वामी

आजच्या मॉडर्न युगात युवतींनी सजग राहावे- ॲड. महेंद्र गोस्वामी

105

आशाताई बच्छाव

IMG_20240303_081327.jpg

आजच्या मॉडर्न युगात युवतींनी सजग राहावे- ॲड. महेंद्र गोस्वामी

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण या कायद्यावर एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन डॉ.बलखंडे महाविद्यालयात करण्यात आले होते. या परिसंवादाचे अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश बन्सोड हे होते.तर प्रमुख उपस्थितीत उप प्राचार्य प्रा.नंदकिशोर शिंगाडे हे होते.तसेच मुख्य मार्गदर्शक म्हणून जेष्ठ विधिज्ञ व माजी न्यायाधीश ॲड. महेंद्र गोस्वामी हे होते.तसेच यावेळी महाविद्यालयाच्या समन्वयक प्रा.स्वाती शंभरकर व विधी समितीचे समन्वयक आशिष सुर्यवंशी उपस्थित होते.

यावेळी मुख्य मार्गदर्शक ॲड. महेंद्र गोस्वामी यांनी पॉक्सो कायद्याची व्याप्ती, कायद्याच्या तरतुदी व शिक्षा याविषयी सखोल मार्गदर्शन केले. युवा, युवती व महिला यांनी लैंगिकता संबंधाने जागरूक राहणे आवश्यक असून काय वाईट व काय चांगले याविषयीची समज बाळगून बॅड टच व गुड टच यांचे ज्ञान ठेवावे व मॉल मध्ये चेंजींग रूमचा वापर करताना अलर्ट राहावे,असे आवाहन केले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश बन्सोड यांनी काय वाईट व काय चांगले यांचे भान ठेवण्याचे प्रतिपादन केले.तर प्रमुख उपस्थितीत उप प्राचार्य प्रा.नंदकिशोर सिंगाडे यांनी बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण व्हावे,अशी आशा व्यक्त केली.

या कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळेचे विस्तृत प्रास्ताविक महाविद्यालयाच्या समन्वयक डॉ.स्वाती शंभरकर यांनी केले.तर सुत्र संचालन प्रा.विलास मेश्राम यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा.अर्चना चाचेरे यांनी केले.यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी,विद्यार्थीनी प्राध्यापक वृंद व कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleजिजामाता उद्यानातील मूर्तींना महाशिवरात्री निमित्त रंगरंगोटी करावी
Next articleदिवंगत संकेत भोसले हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी लोकनेता ना रामदास आठवले
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.