Home उतर महाराष्ट्र दिवंगत संकेत भोसले हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी लोकनेता ना...

दिवंगत संकेत भोसले हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी लोकनेता ना रामदास आठवले

15
0

आशाताई बच्छाव

IMG_20240303_081616.jpg

दिवंगत संकेत भोसले हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी
लोकनेता ना रामदास आठवले.                               श्रीरामपूर दिपक कदम तालुका प्रतिनिधी 

भिवंडीतील दलित युवक संकेत भोसले यांची किरकोळ कारणावरून अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली.या हत्या प्रकरणाचा रिपब्लिकन पक्षातर्फे आम्ही तीव्र निषेध करतो. यातील आरोपींनी मानवतेला काळिमा फासला आहे.भिवंडीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात या दलित युवक हत्येमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.दलित युवक संकेत भोसले हत्या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर फाशीची शिक्षा करावी अशी मागणी आज रिपब्लीकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली.
भिवंडीतील खून झालेल्या दलीत युवक संकेत भोसले यांच्या कुटुंबियांची केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज भिवंडीत सांत्वनपर भेट घेतली.यावेळी राज्यशासनातर्फे दिवंगत संकेत भोसले कुटुंबियांना सव्वा आठ लाख रुपये सांत्वनपर निधी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 लाख रुपये सांत्वनपर निधी मिळवून देणार असल्याचे आश्वासन देऊन रिपब्लिकन पक्षातर्फे 2 लाख रुपयांचा सांत्वनपर निधी देत असल्याचे ना.रामदास आठवले यांनी जाहीर केले. त्यापैकी आज 50 हजार रुपयांची सांत्वनपर मदत ना.रामदास आठवले यांच्या हस्ते दिवंगत संकेत भोसले यांच्या कुटुंबाला देण्यात आली. यावेळी एसीपी सांगळे;रिपाइं चे भिवंडी जिल्हा अध्यक्ष महेंद्र गायकवाड; रिपाइं राष्ट्रीय सचिव सुरेश बारशिंग; ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष संजय गायकवाड; सुमित वजाळे; चंद्रशेखर कांबळे; संगीता गायकवाड आदी अनेक रिपाइं चे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleआजच्या मॉडर्न युगात युवतींनी सजग राहावे- ॲड. महेंद्र गोस्वामी
Next articleसरोज आल्हाट यांना इंडियन पिनॅकल आर्ट आयकॉन नॅशनल अवॉर्ड 2024
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here