Home मुंबई विजेचा लपंडाव पुन्हा सुरू…..युवा मराठा न्युज चॅनेल चे भाकीत अखेर खरे ठरणार...

विजेचा लपंडाव पुन्हा सुरू…..युवा मराठा न्युज चॅनेल चे भाकीत अखेर खरे ठरणार ! महावितरण कंपनीकडून वीज काटकसरीने वापर करण्याचे आवाहन.. लोडशेडिंगचे संकट अटळ….

355
0

राजेंद्र पाटील राऊत

विजेचा लपंडाव पुन्हा सुरू…..युवा मराठा न्युज चॅनेल चे भाकीत अखेर खरे ठरणार ! महावितरण कंपनीकडून वीज काटकसरीने वापर करण्याचे आवाहन.. लोडशेडिंगचे संकट अटळ….

ठाणे (अंकुश पवार, ठाणे शहर प्रतिनिधी, युवा मराठा न्युज चॅनेल)

महाराष्ट्रात कोळसा कमतरतेमुळे वीज दर वाढीचा आणि महाराष्ट्र अंधारात जाईल, या विषयीची बातमी युवा मराठा न्युज चॅनेल ने “युवा मराठा न्युज चॅनेल चे शासन दरबारी साकडे…कधी थांबणार विजेचा लपंडाव? या विषयावर बातमी दि ७ ऑक्टोबर,२०२१ च्या युवा मराठा न्युज चॅनेल ऑनलाईन पोर्टल वर लावली होती”
आता तीन दिवसातच महावितरण ने राज्यातील जनतेला सतर्क आणि जपून वीज वापरण्याचे आवाहन केले आहे. कोळशाच्या टंचाईमुळे औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील ३३३० मेगावॉट क्षमतेचे १३ संच बंद पडले असल्यामुळे लोडशेडींग ची समस्या होऊ शकते, त्यामुळे महावितरण कंपनीकडून सर्व नागरिकांना भारनियमन टाळण्यासाठी सकाळी ६ ते १० व सायंकाळी ६ ते १० विजेचा वापर काटकसीने करावा असे आवाहन केले आहे.

भुसावळ,अमरावती,नाशिक,चंद्रपूर येथील संच बंद पडले असल्यामुळे राज्यात दर दिवसाला ८ तासांचे भारनियमन करावे लागणार असल्याची शक्यता महावितरण कंपनीने वर्तवली आहे.
ही विजेची तूट भरून काढण्यासाठी प्रयत्न केला जात आहे,तरीही नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे.

५ दिवसापूर्वी युवा मराठा न्युज चॅनेल च्या वतीने शासनाला महानिर्मिती,महापरेशन,महावितरण या तिन्ही कंपन्यांना वीज दरवाढ न करण्याची विनंती करण्यात आली होती,तोच आता कोरोना चे संकटं असताना, भारनियमनाचे नवीन संकट घेऊन महावितरण आपल्या समोर उभी राहिले आहे.
विज तूट भरून काढण्यासाठी कोयना आणि इतर १२ हायड्रॉ प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पातून ६०% तूट भरून काढण्यासाठी मदत होईल,परंतु असेच कोळशाची परिस्थिती राहिली तर लोडशेडींग संकटं टाळता येणार नाहीं,असे महावितरण कंपनीकडून कळविण्यात आले आहे.
परंतु केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी कोळसा प्रकरणी आढावा घेतला आहे, देशवासीयांना वीज खंडित न होण्याचे आश्वासन दिले आहे,आणि दुसरीकडे महावितरण कंपनीकडून महाराष्ट्रात सर्व नागरिकांना वीज जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे याला केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा उडालेला गोंधळ दिसून येतो. खरच कोळसा आणि संच बंद पडले असतील तर केंद्र आणि राज्य सरकारला युवा मराठा न्युज चॅनल च्या वतीने पुन्हा एकदा या गोष्टीवर तोडगा काढून आधीच कोरोनामुळे गेले वर्षभर त्रासलेल्या जनतेला लोडशेडिंगचा वाटेवर जाण्यापासून मार्ग काढावा आवाहन करण्यात येत आहे.

Previous articleभोर शहराचे ग्रामदैवत वाघजाई दैवी ची आख्यायिका
Next articleदेवळाली प्रवरा येथे बिबटया चा धुमाकूळ नागरिक भयभीत ..?
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here