Home पुणे भोर शहराचे ग्रामदैवत वाघजाई दैवी ची आख्यायिका

भोर शहराचे ग्रामदैवत वाघजाई दैवी ची आख्यायिका

506
0

राजेंद्र पाटील राऊत

भोर शहराचे ग्रामदैवत वाघजाई दैवी ची आख्यायिका               भोर,(महेश भेलके प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

भोर एक जुने संस्थान ज्याचे तालुक्यामध्ये रूपांतर झाले भोर शहरात अनेक ऐतिहासिक देवीची मंदिरे आहेत,
1)भोर शहराचे ग्रामदैवत श्री वाघजाई माता मंदिर -वर्षानुवर्षे भोर शहराच्या दक्षिण बाजूला असलेलं ग्रामदैवत अशी एक आख्यायिका आहे की भक्त बाबाजी भेलके नावाचे एक शहरातील भक्त जे शहरानजीक असलेल्या आणि तालुक्यातील बाजारवाडी ,हातनोशी ,चिखलावडे गावांच्या डोंगर भागावर वाघजाई मातेचे मूळ स्थान आहे हे भक्त रोज नित्य नेमाने त्याठिकाणी देवीची पूजा करण्यासाठी जात असत जेव्ह वृद्धावस्था आली तेव्हा ते थकले आणि देवीला बोलले आई माझ्याकडून आता तुझी नित्य सेवा घडू शकणार नाही इच्छा असून सुद्धा वृद्धावस्थेमुळे मला आता डोंगर चढून येणं शक्य होणार नाही इथून पुढे तुझी नित्य सेवा घडावी असा उपाय सांग तेव्हा वाघजाई मातेचा त्यांना दृष्टांत झाला आणि देवी बोलली डोंगरावरन पूजा करून येताना शहरालगतच्या जागेपाशी जिथे तू मागे वळून पाहशील त्याठिकाणी मी प्रकट होईल आणि असेच घडले जेव्हा त्या भक्ताने मागे वळून पाहिले तर त्याठिकाणी एक पाषाण प्रकट झाले आणि तेव्हापासून भोर शहराचे ग्रामदैवत त्याठिकाणी प्रसिद्ध झाले .आजही ते भक्त बाबाजी भेलके यांचे मंदिर(स्मारक)मंदिराच्या उजव्या बाजूला बांधण्यात आलेले आहे .
सदर माहिती ऐकीव आणि जुने जाणकार व्यक्तींच्या मुखातून ऐकलेली आहे ती पोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here