Home गडचिरोली अभाविपचा गोंडवाना विद्यापिठाच्या कुलगुरुंना घेराव। अभाविपने दिलेल्या निवेदनाची दखल जर विद्यापिठाने लवकरात...

अभाविपचा गोंडवाना विद्यापिठाच्या कुलगुरुंना घेराव। अभाविपने दिलेल्या निवेदनाची दखल जर विद्यापिठाने लवकरात लवकर जर घेतली नाही तर अभाविप द्वारे विद्यापिठाला कुलूप लावण्यात येईल अशा ईशारा दिला.

75
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220521-WA0021.jpg

अभाविपचा गोंडवाना विद्यापिठाच्या कुलगुरुंना घेराव।
अभाविपने दिलेल्या निवेदनाची दखल जर विद्यापिठाने लवकरात लवकर जर घेतली नाही तर अभाविप द्वारे विद्यापिठाला कुलूप लावण्यात येईल अशा ईशारा दिला.
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गडचिरोली द्वारे गोंडवाना विद्यापिठावर विद्यार्थ्यानचा विविध समस्यांना घेवुन दि.21 मे ला निदर्शने झालीत यामधे नागपुर विद्यापिठाने परिक्षा संदर्भात घेतलेल्या निर्णयाच्या पाश्र्वभूमीवर गोंडवाना विद्यापिठाने सुध्दा नागपुर विद्यापिठाची ऑफलाईन MCQ पॉटन परिक्षा गोंडवाना विद्यापिठात सुध्दा राबवावी यामुळे विद्यापिठातील विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही.तसेच परिक्षेचा प्रश्नसंच विद्यापिठाच्या संकेत स्थळावर अजुन सुध्दा आली नाही त्यामुळे ती लवकरात लवकर संकेत स्थळावर टाकावी.
विद्यापिठातील विद्यार्थी अजुन सुध्दा प्रयोगशाळेपासुन वंचित आहेत.त्यामुळे लवकरात लवकर विद्यापिठाची स्वतंस्ञ प्रयोगशाळा विद्यार्थ्यानां उपलब्ध करुन द्यावी तसेच आचार्य पदवी शीक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा कोर्सवर पूर्ण हऊन जवळजवळ सहा महिने हऊन पूर्ण झाले तरीसुद्धा कोर्स नंतरचे अजूनही परिक्षा आपल्या विद्यापिठाने घेतली नाहीत.आचार्य पदवी शीक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यानां रिसर्च सेंन्टरची फी ही यावर्षी विद्यापिठाने अवाढव्य वाढवली आहे. त्याचा फटका सामान्य विद्यार्थाना बसला आहे त्यामुळे हि फि कमीत कमी करण्यात यावी.
जिमखाना, अंभियांञीकिची परिक्षा पुढे ढकलावी यासारखा अन्य विषयावर सुध्दा अभाविपने निवेदनात मागणी केली दिलेल्या निवेदनाची दखल जर विद्यापिठाने लवकरात लवकर नाही घेतली तर अभाविप द्वारे विद्यापिठाला कुलूप लावण्यात येईल असा इशारा अभाविप नगरमंञी जयश ठाकरे,जिल्हा संयोजक अंकुश कुनघाडकर,चेतन कोलते,अमन नवघडे,श्रुती कानेकर,सागर हाजरा,तुषार तांबेकर,चिराग कोटगले,प्रविण चलाख,संदेश उरकुडे,अर्पित नंदेश्वर,सोनल राखडे,संकेत सोनुले,हषद कायाकर,खिलेश फरदिया,आकाश मेश्राम,प्रांत सहमंञी प्रविण पाञिकर,गडचिरोली विभाग संघटन मंञी शक्ती केराम आदिंनी इशारा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here