• Home
  • *कळवणला केंद्र शासनाच्या निर्णयाचे तहसिलदारांना निवेदन देऊन शेतकरी संघटनेकडून स्वागत*

*कळवणला केंद्र शासनाच्या निर्णयाचे तहसिलदारांना निवेदन देऊन शेतकरी संघटनेकडून स्वागत*

*कळवणला केंद्र शासनाच्या निर्णयाचे तहसिलदारांना निवेदन देऊन शेतकरी संघटनेकडून स्वागत*
कळवण,(बाळासाहेब निकम तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- केंद्र शासनाने शेती माल व्यापार सुधारा संदर्भात परित केलेल्या अध्यादेशाचे कळवण तालुका शेतकरी संघटनेकडून स्वागत करण्यात आले.
सरकारने शेतमाल व्यापार सुधार संबंधी तीन अध्यादेश ५ जुन २०२० रोजी परित केले असून कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मक्तेदारी संपविणे,आँनलाईन शेतमाल व्यापाराव्दारे एक देश एक बाजार व्यवस्था निर्माण करणे.आवश्यक कायद्यातून प्रमुख शेतमाल वगळणे,करार शेतीला प्रोत्साहन देणे हे निर्णय शेतीच्या फायद्याचे आहेत.गेली चाळीस वर्ष जुनी हि शेतकरी संघटनेची मागणी होती.ती प्रत्यक्षात साकार केल्याबद्दल आज कळवण तालुका शेतकरी संघटना व शेतकऱ्यांच्या वतीने कळवणचे तहसिलदार बंडू कापसे यांना निवेदन देऊन शासन निर्णयाचे स्वागत करुन आभार मानण्यात आले.यावेळी देविदास पवार प्रदेश उपाध्यक्ष,बाळासाहेब शेवाळे कळवण तालुकाध्यक्ष,विलास नाना कांदा उत्पादक शेतकरी संघटना कळवण तालुकाध्यक्ष,दादाभाऊ जाधव,राकेश आहेर,दिलीप शेवाळे,रमेश बच्छाव,संदीप जाधव,प्रविण जाधव,सुरेश जाधव ,अशोक जाधव आदीसह शेतकरी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.

anews Banner

Leave A Comment