Home Breaking News 🛑 रेल्वेने तयार केला भन्नाट कोविड कोच…संसर्गमुक्त प्रवास करण्याचा दावा 🛑 मुंबई...

🛑 रेल्वेने तयार केला भन्नाट कोविड कोच…संसर्गमुक्त प्रवास करण्याचा दावा 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

121
0

🛑 रेल्वेने तयार केला भन्नाट कोविड कोच…संसर्गमुक्त प्रवास करण्याचा दावा 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 15 जुलै : ⭕ कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी संपूर्ण देशाने कंबर कसली असताना,आता रेल्वेने सुद्धा कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी सुसाट धावण्यासाठीचा प्रयत्न सुरु केला आहे. रेल्वेने चक्क प्रवाशांमध्ये कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पोस्ट कोविड कोच तयार केला आहे. या कोचमधून प्रवास केलयास कोरोनाचा संसर्ग होणार नसल्याचा दावा रेल्वे करतेय आहे. चला तर जाणून घेऊयात हि ट्रेन नक्की कशी बनवली आहे ती.

कोरोनामुळे देशात प्रवासी सेवा ठप्प झाली, यामुळे रेल्वेला कोट्यवधींचा तोटा झाला आणि होतोय हि, त्यातच आता संसर्गाच्या भीतीने रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्येहि मोठी घट होणार आहे. यामुळे रेल्वेला दुहेरी संकटाचा सामना करावा लागणार आहे. त्यातच दिवाळीनंतर सर्व सुरळीत होणार असल्याचे बोललं जात असल्याने कदाचित प्रवाशांना कोरोना सोबतही प्रवास करावा लागू शकतो. या सर्व बाबींवर विचार करत रेल्वेने प्रवाशांना कोरोना संसर्गमुक्त प्रवास करता यावा या दृष्टीने पोस्ट कोविड कोच तयार केला आहे. हा कोच भारतीय रेल्वेची कोच फॅक्टरी (आरसीएफ), कपूरथळा येथे हा बनवण्यात आला आहे.

कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी हे दोन कोविड कोच डिझाइन केले गेले असल्याचे नॅशनल ट्रान्सपोर्टरचे म्हणणे आहे. तसेच या ट्रेनमध्ये असलेल्या विविध सुविधांमुळे नागरिकांमद्ये असलेली संसर्गाची भीती कमी होईल व प्रवासी संख्या वाढणार आहे. याचा संपूर्ण फायदा रेल्वचे प्रवासी व महसूल वाढीस होणार आहे.

ट्रेनची खासियत :-

➡️ हँड्सफ्री सुविधा :-
या ट्रेनमध्ये प्रवाशांना हँड्सफ्री सुविधा देण्यावर भर देण्यात आला आहे. ट्रेनमधील पाण्याद्वारे हात धुवायचे असल्यास पाणी व साबण यासाठी नळ अथवा साबणाला हात लावायची गरज पडणार नाही आहे. तुम्ही नळा शेजारी गेल्यास तुमच्या फूटप्रिंटद्वारे नळातून पाणी व साबण वितरण होणार आहे. तसेच फूटप्रिंटद्वारे ट्रेनच्या बाहेरील दरवाजा, फूट पाडलेल्या दरवाजामधील लॅच उघडणार आहेत.

➡️ कॉपर लेपित हँड्रिल आणि लॅचः-
कॉपरवर विषाणू बसल्यास, रोगकारक विषाणूच्या आतील डीएनए तसेच आरएनए नष्ट करते.हाच कॉपरचा गुणधर्म लक्षात घेत रेल्वेने या कोचमध्ये कॉपर लेपित हँड्रिल आणि लॅच बनवले आहे. जेणेकरून जर प्रवाशांनी या कॉपर लेपित हँड्रिल आणि लॅचला हात लावल्यास काहीच क्षणात विषाणू नष्ट होतील आणि त्याचा नागरिकांमध्ये संसर्गही होणार नाही.

➡️ प्लाझ्मा एअर प्युरिफायर:-
एसी डक्टमध्ये प्लाझ्मा एअर उपकरणांची तरतूद आहे.एसी कोचच्या आत, आयनीइज्ड एअरचा वापर करून कोच कोविड -१ आणि पार्टिक्युलेट मॅटरला प्रतिरोधक बनविण्यासाठी एअर आणि पृष्ठभागांचे निर्जंतुकीकरण केले जाईल. आयन एकाग्रतेत 100 आयन / सेमी 3 पासून 6000 आयन / सेमी 3 पेक्षा जास्त सुधारणा देखील आहेत.

➡️ टायटॅनियम डी-ऑक्साईड कोटिंग:-
टायटॅनियम डाय-ऑक्साईड मानवांसाठी हानिरहित आहे. नॅनोस्ट्रक्चर केलेले टायटॅनियम डायऑक्साइडद्वारे केलेले कोटिंग, फोटोएक्टिव्ह सामग्री म्हणून कार्य करते. जल-आधारित कोटिंग पर्यावरणास अनुकूल आहे जे विषाणू, जीवाणू, बुरशी, तसेच बुरशीजन्य वाढ नष्ट करते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते घरातील हवेची गुणवत्ता वाढवते. हे विषारी नसलेले आहे आणि ते अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासन (एफडीए) च्या अन्न चाचणी प्रयोगशाळेने मंजूर केले आहे. तसेच सीई प्रमाणित आहे. हे कोटिंग वॉशबेसिन, सीट आणि बर्थ, लव्हरेटरी, ग्लास विंडो, स्नॅक टेबल, फ्लोर आणि मानवी संपर्कात येणार्‍या प्रत्येक पृष्ठभागावर लागू केले जाते.⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here