• Home
  • 🛑 जिल्हाधिकारी म्हणतात…! लॉकडाउनमुळे कोरोनाच्या रुग्ण वाढीस ब्रेक 🛑 ✍️जळगाव:( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 जिल्हाधिकारी म्हणतात…! लॉकडाउनमुळे कोरोनाच्या रुग्ण वाढीस ब्रेक 🛑 ✍️जळगाव:( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 जिल्हाधिकारी म्हणतात…! लॉकडाउनमुळे कोरोनाच्या रुग्ण वाढीस ब्रेक 🛑
✍️जळगाव:( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

जळगाव :⭕ कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 7 ते 13 जुलै दरम्यान जळगावसह भुसावळ, अमळनेर या ठिकाणी पाळण्यात आलेला “स्थानिक लॉकडाउन’ संपणार आहे.

मात्र, जळगाव शहरातील सर्व व्यापारी संकुले बंदच राहतील. सकाळी 9 ते सायंकाळी 7 दरम्यान सम विषम तारखेनुसार दुकाने सुरू राहतील, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.
“कोरोना’ संसर्गाची संख्या रोखण्यासाठी 7 ते 13 जुलै असा जळगाव, अमळनेर व भुसावळ शहरत स्थानिक लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. त्याची मुदत 13 जुलै रोजी रात्री संपत आहे. शहरातील व्यवसाय सुरू होणार आहे. मात्र बाजारपेठ पूर्ण वेळ सुरू न राहता सकाळी 9 ते सायंकाळी सातपर्यंत सुरू राहणार आहे.

यात महापालिका क्षेत्रातील व्यापारी संकुले, मॉल बंद ठेवण्यात येणार आहेत.
लॉकडाउनचा फायदा झाल्याचे सांगून जिल्हाधिकारी राऊत म्हणाले, की पूर्वी शंभर नागरिकांची तपासणी होत होती, तेव्हा 28 रुग्ण पॉझिटिव्ह निघत होते. आता 100 नागरिकांची तपासणी केली, तर 14 रुग्ण पॉझिटिव्ह निघत आहेत…⭕

anews Banner

Leave A Comment