Home बुलढाणा ओबीसी आरक्षण प्रश्न निकाली काढा अन्यथा ओबीसी सह भारतीय जनता पार्टी उतरणार...

ओबीसी आरक्षण प्रश्न निकाली काढा अन्यथा ओबीसी सह भारतीय जनता पार्टी उतरणार आंदोलनात

48
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220522-WA0018.jpg

ओबीसी आरक्षण प्रश्न निकाली काढा अन्यथा ओबीसी सह भारतीय जनता पार्टी उतरणार आंदोलनात

   संग्रामपूर ,((रविंद्र शिरस्कार युवा मराठा न्युज नेटवर्क)

माननीय सर्वोच्च न्यायालयाने मध्यप्रदेश ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सकारात्मक भूमिका घेत निकाल दिला. मध्यप्रदेश सरकारने ट्रिपल टेस्ट करून दि.१८ मे ला ओबीसींचा राजकीय आरक्षणाचा प्रश्न निकाली काढला.

सतत वेळकाढू धोरण अवलंबिनाऱ्या राज्य शासनाला आता तरी जाग आलीच पाहिजे, जे मध्यप्रदेश सरकारला शक्य झाले ते राज्य शासनाला कधी शक्य होणार आहे? हे आता जनतेला समजावून सांगण्याची वेळ आली आहे. ओबीसीना राजकिय आरक्षण मिळू नये हाच हेतू महाभकास आघाडी सरकारचा आहे, सर्वोच्च न्यायालयाने मध्यप्रदेशच्या बाबतीत दिलेला निकाल पाहता आता राज्य शासनाला ना-ईलाजास्तव का होईना ओबीसींना आरक्षण द्यावेच लागेल, जो पर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळणार नाही तो पर्यंत भारतीय जनता पक्ष ओबीसींच्या न्याय हक्काची लढाई लढतच राहणार आहे.
असा इशारा मा. आमदार डॉ. संजय कुटे यांनी दिला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here