Home Breaking News 🛑 ‘Whatsapp Chatbot Assistant’ आतापर्यंत जे घडले नाही ते रिलायन्स करणार 🛑...

🛑 ‘Whatsapp Chatbot Assistant’ आतापर्यंत जे घडले नाही ते रिलायन्स करणार 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

76
0

🛑 ‘Whatsapp Chatbot Assistant’ आतापर्यंत जे घडले नाही ते रिलायन्स करणार 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 15 जुलै : ⭕ रिलायन्स इंडस्ट्रीजची ४३ वी सर्वसाधारण सभा यंदा बुधवारी १५ जुलै रोजी होणार आहे. दरवर्षीप्रमाणे मुंबईतील बिर्ला मातोश्री सभागृहात ही सभा होणार नाही. करोनाचे संकट आणि लॉकडाउन यामुळे कंपनीने ही सभा ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंपनीने जय्यत तयारी केली आहे.

करोनाच्या संकटात औद्योगिक क्षेत्राची वाताहत झाली असली तरी याच काळात रिलायन्स इंडस्ट्रीजने आपली घोडदौड कायम ठेवली आहे. विशेष म्हणजे मागील दोन महिन्यात ‘जिओ’ने घसघशीत कमाई करून रिलायन्स समूहाला कर्जमुक्त केले आहे. तोच रिलायन्स समूह उद्या एका नवा रेकॉर्ड करणार आहे. कॉर्पोरेटमध्ये आतापर्यंत जे घडलं नाही ती गोष्ट रिलायन्स इंडस्ट्रीज वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने करणार आहे.

रिलायन्स समूहाच्या (Reliance Industries) आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच आॅनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेचे (Annual General Meeting) आयोजन केले आहे. या सभेला एकाच वेळी किमान एक लाख समभागधारक सहभागी होतील, अशी यंत्रणाच रिलायन्स इंडस्ट्रीजने उभी केली आहे. या ऑनलाइन सभेसाठी चॅटबोट (Chatbot Assistant) या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. उद्या बुधवारी दुपारी २ वाजता रिलायन्स इंडस्ट्रीजची ४३ वी आॅनलाइन सर्वसाधारण सभा सुरु होणार आहे.

समभागधारकांना दरवर्षी रिलायन्सच्या वार्षिक सभेची उत्सुकता लागलेली असते. सभेत रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी रिलायन्सच्या भविष्यातील योजनांची घोषणा करतात. या सभेच्या पार्श्वभूमीवर रिलायन्सच्या शेअरवर पडसाद उमटतात. रिलायन्सची गुंतवणूक, विस्तार याबाबत समभागधारक आणि गुंतवणूकदाराना या सभेत संकेत मिळतात. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातील समभागधारकांची संख्या देखील प्रचंड आहे. या सर्वांना पहिल्यांदाच रिलायन्सच्या सभेला उपस्थित राहता येणार आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे जवळपास २६ लाख समभागधारक आहेत. त्यापैकी ५०० ठिकाणांहून उद्या ऑनलाइन सभेला किमान एक लाख समभागधारक उपस्थित राहतील असा अंदाज रिलायन्सच्या टीमने बांधला आहे. त्यादृष्टीने तांत्रिक बाबी पूर्ण करण्यावर सध्या आयटी विभागाचा भर आहे. रिलायन्सने जिओच्या हिस्साविक्रीतून आतापर्यंत १.१८ लाख कोटी उभारले आहेत.

या सभेला किमान एक लाख समभागधारक उपस्थित राहिल्यास इतक्या विक्रमी संख्येने समभागधारकांना एकाच तंत्रज्ञानाच्या आधारे एका ठिकाणी एकत्र करण्याचा कॉर्पोरेटमधील हा पहिलाच प्रयोग आहे. ही सभा यशस्वी झाली तर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नावे आणखी एक विक्रम नोंदवला जाईल. यापूर्वी जिओ हॅपटीकच्या याच चॅटबोट (Chatbot)ने रिलायन्सच्या ५३१२४ कोटींच्या राईट इश्यूमध्ये मोलाची भूमिका बजावली होती.

◀️ ‘Whatsapp Chatbot Assistant’ ने सभेत सहभागी होण्यासाठी हे करा ▶️

➡️ आपल्या व्हाट्सअपवरून +९१७९७७११११११ या क्रमांकावर मेसेज करा.

➡️ हा नंबर तुमच्या मोबाइलमध्ये सेव्ह करा जेणे करून संपर्क करणे सुलभ जाईल.

➡️ Chatbot Assistant ला किवर्ड पाठवा.

➡️ तुम्ही किवर्ड पाठवल्यानंतर Chatbot Assistant चा एक मेसेज तुम्हाला पर्याय समोर ठेवेल.

➡️ त्यानंतर योग्य पर्याय निवडा आणि सभेमध्ये सहभागी व्हा.

➡️ काही तांत्रिक अडचणी असल्याने Chatbot Assistant त्यावर तात्काळ उत्तरे देतो आणि युजरला योग्य मार्ग सुचवतो.

➡️ Chatbot Assistant आठवड्याचे २४ तास चालणारी यंत्रणा असून एकाच वेळी ५०००० प्रश्नांची उत्तरे देण्याची क्षमता आहे. ही उत्तरे मेसेज आणि व्हिडीओच्या माध्यमातून दिली जातील.

➡️ Chatbot Assistant FAQs, to-dos for the AGM, voting, dividend, taxation याबाबत माहिती पुरवतो.⭕

Previous article🛑 यंदा दहीहंडी नाही पण ‘जय जवान’ गोविंदाने पथकाने जपली बांधिलकी 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
Next article🛑 रेल्वेने तयार केला भन्नाट कोविड कोच…संसर्गमुक्त प्रवास करण्याचा दावा 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here