• Home
  • *सातारा जिल्ह्यातील विर जवान* *सचिन जाधव लेह लडाख सिमेवर* *शहीद*

*सातारा जिल्ह्यातील विर जवान* *सचिन जाधव लेह लडाख सिमेवर* *शहीद*

*सातारा जिल्ह्यातील विर जवान* *सचिन जाधव लेह लडाख सिमेवर* *शहीद*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

गेल्या काही महीन्यांपासुन भारत
आणि चिनदरम्यान सिमेवर तणाणवाच वातावरण आहे.
काल सातारा जिल्ह्यामधील पाटण तालुक्यातील दुसाळे गावचे वीर जवान सचिन संभाजी जाधव (वय ३८) हे लेह लडाख सीमेवर कर्तव्य बजावत असताना शहीद झाले आहेत. सचिन हे १११ इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये नाईक या पदावर कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. शहीद जवान सचिन यांचे वडील संभाजी जाधव मेजर सुबेदार पदावरून निवृत्त झाले आहेत. तर सध्या भाऊही देशसेवा बजावत आहेत. शुक्रवारी रात्री शहीद जवान जाधव यांचे पार्थिव पुणे विमानतळावर आणले जाणार आहे. त्यानंतर ते त्याच्या मुळ गावी आणलं जाणार असून लष्करी इतमामात कोविडचे नियम पाळून अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीनदरम्यान सीमेवर तणाव आहे.
चीनच्या मुजोरीच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. त्यातच चीन भारतातल्या महत्त्वाच्या व्यक्तिंवर नजर ठेवत असल्याचंही उघड
झालं होतं. आता आणखी एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. चीन भारतीय युद्धनौकांवरही पाळत ठेवत होता, अशी माहिती समोर आली आहे.

anews Banner

Leave A Comment