Home बीड नागरिकांची तहान भागवण्यासाठी पाणपोईचा आधार अँड.मनोज संकायेचा स्तुत्य उपक्रम!

नागरिकांची तहान भागवण्यासाठी पाणपोईचा आधार अँड.मनोज संकायेचा स्तुत्य उपक्रम!

23
0

आशाताई बच्छाव

1000271472.jpg

नागरिकांची तहान भागवण्यासाठी पाणपोईचा आधार अँड.मनोज संकायेचा स्तुत्य उपक्रम!

आयडीबीआय बँक जवळील संगम डिमोल्युशन येथे पाणपोईची सुरुवात !

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड/परळी दि: ०९  रोजी परळी शहरात
गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभमुहूर्ताचे औचित्य साधून परळी येथील सामाजिक कार्यकर्ते अँड.मनोज संकाये मित्र मंडळाच्या वतीने मोंढा मार्केट परिसरातील आयडीबीआय बँक शेजारी संगम डिमोल्युशन येथे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून पाणपोईची सुरुवात करून उद्घाटन करण्यात आले. पाणपोईच्या थंडगार पाण्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. उन्हाळ्यामध्ये उन्हाची आणि उष्णतेची तीव्रता मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली आहे. या एप्रिल महिन्यात अतिशय कडक उन्हाळा नागरिकांना जाणवू लागला आहे. तापमानाची पातळी चाळीस अंश सेल्सिअस एवढ्यावर जाऊन पोहोचले आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. परळी हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे खेडेगावातील तसेच शहरातील आणि परिसरातील नागरिक कामानिमित्ताने तालुक्याच्या ठिकाणी येत असतात. पिण्याच्या पाण्याची सर्वत्र टंचाई असल्यामुळे मोंढा मार्केट येथे त्यांची सोय व्हावी म्हणून पाणपोईची सुरुवात केली आहे. याचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन मित्र मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. यावेळी ८२ व्या तपोवनष्ठान समितीचे अध्यक्ष व नगरसेवक चेतन सौंदळे, मोहन चव्हाण पत्रकार, अनिल चौधरी, जिरेवाडीचे उपसरपंच राहुल कांदे, रमेश चौधरी,गिरीश सलगिरे, रमेश संकाये, काशिनाथ सरवदे, शिवा बडे, संतोष कांबळे, सदानंद चौधरी, कैलास रिकिबे,संदीप मेहत्रनकर, राम गडदे, अशोक सुरवसे आदीसह मित्रमंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleधनंजय मुंडेंच्या बीड जिल्हावासियांना गुढीपाडवा निमित्त शुभेच्छा
Next articleलग्नाचे आमिष दाखवून २० वर्षीय मुलीवर बलात्कार!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here