Home बीड धनंजय मुंडेंच्या बीड जिल्हावासियांना गुढीपाडवा निमित्त शुभेच्छा

धनंजय मुंडेंच्या बीड जिल्हावासियांना गुढीपाडवा निमित्त शुभेच्छा

20
0

आशाताई बच्छाव

1000271470.jpg

धनंजय मुंडेंच्या बीड जिल्हावासियांना गुढीपाडवा निमित्त शुभेच्छा

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड/परळी दि: ०९  एकीकडे राज्यात व विशेष करून आपल्या बीड जिल्ह्यात दुष्काळ दृश्य परिस्थिती आहे. या परिस्थितीत हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाचा साडेतीन मुहर्तापैकी एक असलेला गुढीपाडवा चल आपण साजरा करत आहोत, त्यात सर्वत्र लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत. अशात सणाच्या उत्सवाबरोबरच आपले स्नेहबंध जोपासत, सर्वाप्रति आपुलकी व विश्वास निर्माण करणारी एक गुढी यंदा उभारू; अशा शब्दात राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हावाशीयांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. चैत्र शुद्ध प्रतिपदा, अर्थात साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला गुढीपाडव्याचा आज सण आहे. आनंद, स्नेह, आपुलकी, वृद्धिंगत करणारा व सामाजिक एक्याची जपवणूक करणारा हा सण साजरा करताना सर्वांनाच त्यात संमिलित करून घेऊ. असा संदेश धनंजय मुंडे यांनी दिला आहे. दरम्यान गुढीपाडव्याच्या नंतर दोनच दिवसात रमजान ईदचेही पर्व संबंध जगभरात मुस्लिम समाज साजरे करणार आहे. तेव्हा सामाजिक सलोखा व बंधुभाव जपण्याची ही दुहेरी संधी असल्याचेही धनंजय मुंडे यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

Previous articleपरस्‍पराच्‍या सण- उत्‍सवात सहभागी होवून सर्वांचा आनंद द्विगुणित करु या -जिल्‍हाधिकारी
Next articleनागरिकांची तहान भागवण्यासाठी पाणपोईचा आधार अँड.मनोज संकायेचा स्तुत्य उपक्रम!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here