Home Breaking News 🛑 भुज चा हल्ला,भारताच्या स्वाभिमानासाठी लढलेला ‘मराठमोळा जवान’ आहे तरी कोण…? 🛑

🛑 भुज चा हल्ला,भारताच्या स्वाभिमानासाठी लढलेला ‘मराठमोळा जवान’ आहे तरी कोण…? 🛑

127
0

🛑 भुज चा हल्ला,भारताच्या स्वाभिमानासाठी लढलेला ‘मराठमोळा जवान’ आहे तरी कोण…? 🛑
✍️ चंदेरी दुनियेत 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

चंदेरी दुनियेत :⭕ अजय देवगणचा बहुचर्चित सिनेमा ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’चा ट्रेलर प्रदर्शित झाला. येत्या ऑगस्ट महिन्यात भुज हॉटस्टार सिनेप्लेक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवार येतोय.

या सिनेमात अजय देवगणने स्‍क्‍वाड्रन लीडर विजय कर्णिक यांची भूमिका निभावली आहे, त्यावेळेस भुजच्या एयरबेसची विजय कर्णिक यांनी कशाप्रकारे सुरक्षा केली होती, त्याचं चित्रण या सिनेमात तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे.

*ती घटना नेमकी आहे तरी काय?*

३ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानी एयर फोर्सकडून ऑपरेशन चंगेज खानची सुरुवात झाली, भारतीय वायुसेनेच्या ११ एयरफील्डवर पाकिस्तानने बॉम्बहल्ला करायला सुरुवात केली, यामुळेच खरंतर युद्धाला सुरुवात झाली.
काश्मीर, अमृतसर, अंबाला, जोधपुर, जैसलमेर, पठाणकोट, भुज बरोबरच आणखी काही एयरबेसवर पाकिस्तानने हल्ला केला. यानंतर भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी युद्धाची घोषणा केली!

*भुजचा हल्ला इतका भयानक का होता?*

सलग वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बहल्ले केल्यानंतर गुजरातच्या कच्छमधील रुद्रमाता एयरफोर्स बेसवरसुद्धा पाकिस्तानी विमानांनी हल्ला सुरू केला. १४ दिवसात ३५ वेळा हल्ला करून पाकिस्तानी एयरफोर्सने ९२ बॉम्ब आणि २२ रॉकेटसह भुजचा एयरबेस बेचिराख केला होता.

७२ तासात ३०० महिलांच्या मदतीने हा सगळा एयरबेस पुन्हा पूर्णपणे तयार करण्यात आला, ज्यात तिथल्याच माधोपुर गावाच्या कित्येक महिलांना मोलाचं योगदान दिलं!

त्यावेळेस या एयरबेसचे कमांडर होते स्‍क्‍वाड्रन लीडर विजय कुमार कर्णिक.

त्यावेळेस या एयरबेसचे कमांडर होते स्‍क्‍वाड्रन लीडर विजय कुमार कर्णिक.

*कोण आहेत स्‍क्‍वाड्रन लीडर विजय कर्णिक?*

महाराष्ट्राच्या मातीत म्हणजे नागपूरमध्ये लहानाचे मोठे झालेले आणि शिक्षणही इथेच पूर्ण केलेले विजय कर्णिक यांनी नंतर १९६२ मध्ये इंडियन एयर फोर्समध्ये भरती होणे पसंत केले, आपला भाऊदेखील सैन्यात असल्याने देशसेवेचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले होते.

१९७१ च्या युद्धाच्या दरम्यान ते भुजच्याच एयरबेसवर तैनात होते आणि बेचिराख झालेला एयरबेस पुन्हा उभा करण्याची जबाबदारी त्यांच्यावरच सोपवण्यात आली होती.

स्‍क्‍वाड्रन लीडर विजय कर्णिक यांनी आपले २ सहकारी ऑफिसर्स आणि ५० वायुसैनिक यांना हाताशी घेऊन भुजच्या एयरबेसला पूर्ववत करण्यासाठी प्राण पणाला लावून लढले.

शिवाय तिथल्याच स्थानिक महिलांना हाताशी घेऊन त्यांनी तो एयरबेस पुन्हा ऑपरेशनल केला ज्यामुळे एयरस्ट्राइक होत असतानाही जवानांना बेसवर आणण्यासाठी येणाऱ्या लढाऊ विमानांची गैरसोय झाली नाही.

नंतर सरकारकडून या ३०० महिलांना रोख रक्कम ५०००० रुपयांचं बक्षीसही देण्यात आलं..! ⭕

Previous articleखा.प्रतापराव पा.चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सर्व रोगनिदान शिबिर..
Next article🛑 अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी होणार ‘ग्रॅज्युएट’, पाहा BA ची मार्कशीट 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here