Home पुणे माझी गुरु “आई कौशल्या

माझी गुरु “आई कौशल्या

42
0

आशाताई बच्छाव

IMG-20230702-WA0029.jpg

श्री संजय वाघमारे पुणे हवेली तालुका प्रतिनिधी: माझी गुरु “आई कौशल्या “आज दिनांक ३ जुलै २०२३ हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून संपूर्ण जगामध्ये साजरा होत आहे. या गुरुपौर्णिमा निमित्त मी आपल्याला एक खास व्यक्तिमत्व असलेल्या माझ्या गुरूंविषयी बोलणार आहे. ती गुरु आहे माझी जन्मदाती आई “कौशल्या” खरंतर कौशल्या या नावातच खूप काही आहे. या नावानेच संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला आहे. योगायोगाने मला कौशल्या सारखीच आई म्हणून, त्याच बरोबर एक गुरु म्हणून मिळाली ही आहे. माझी पहिली गुरु आणि योगायोगाने ती आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये गुरु म्हणूनच राहिली. कारण तिने खूप काही शिकवलं ते म्हणजे आपल्याला कसं जगायचं हे समजलं, कसं जगावे हे समजलं, कोणाबरोबर कसं बोलावं हे समजलं, कोणाबरोबर कसं वागावं हे समजलं, व्यवहार ज्ञान कसे असावे हेही समजलं, माणसं कशी ओळखायची हे समजलं कोण आपलं कोणतं हेही समजलं असे अनेक पैलूंवर मला माझे आईने प्रत्येक पावलापावली खूप समजावून सांगितलं. तिच्या जगण्यातून मला ते खूप जाणवत असायचे, तसं जर पाहिलं तर माझी आई पूर्ण अडाणी आहे. तिला शिक्षणाचा ‘अ’ सुद्धा माहिती नाही परंतु आई कशी असावी हे तिच्या तंतोतंत् जगण्यातून, वागण्यातून समोरच्याला समस्त ते मलाही समजलं. म्हणून माझ्या आयुष्यामध्ये आई तर मिळालीच पण आईच्या रूपामध्ये गुरु सुद्धा मिळाली . अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा परिस्थितीला कसे सामोरे जावे, स्वतःवरती कसा संयम ठेवावा हे खूप महत्त्वाचे आहे. हे त्यांच्या खडतर जगण्यातून मला समजलं व ते अवगत झाल.आईसाठी खूप बोलावे वाटतं परंतु येथेच थांबतो.या गुरुपौर्णिमा निमित्ताने माझ्या आईच्या चरणाचे स्पर्श करून या गुरुपौर्णिमा निमित्ताने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचे आशीर्वाद असेच सदैव पाठीशी राहू दे ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद माझी आई गुरु “कौशल्या”

Previous articleजन्म देणारी पहिला गुरु आई,जीवनाला दिशा देणारा दुसरा गुरु बच्छाव आशाताई!!
Next articleगुरु म्हणजे आपल्या आयुष्यरुपी सागराचा आरसा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here