राजेंद्र पाटील राऊत
गुरुपौर्णिमा विशेष जन्म देणारी पहिला गुरु आई,जीवनाला दिशा देणारा दुसरा गुरु बच्छाव आशाताई!!
आज गुरुपौर्णिमा सर्वात प्रथम सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा! गुरु म्हणजे कोण? जो सन्मार्गावर घेऊन चालतो,भरकटलेल्या जीवनाला योग्य ते वळण लावतो.अन जेथे चुकत असाल तेथे खडसावून चार शब्द बोलतो.असा गुरु हा अनमोलच असतो.गुरु बिना जीवन व्यर्थ आहे.जीवनात कुणी तरी आपला गुरु मार्गदर्शक असावाच त्याशिवाय हे जीवन व्यर्थ आहे.माझ्या जीवनातला पहिला गुरु माझी आई स्वर्गिय लक्ष्मीबाई पाटील राऊत या ठरतात.ज्या मायमाऊलीने मला जन्म देऊन,माझे पालन पोषण केले.व योग्य संस्कारक्षम बनविले.तर जीवनातील घरच्या गरीबीमुळे लोकांच्या दारोदार पेपर वृतपत्र वाटपाची करीत असलेली कामे पाहून लोक नाके मुरडायचीत,तर कुणी नावे ठेवायचीत,असे कागद विकून थोडेच पोट भरते.अशाना थोडाच संसार होतो,अशा रितीने माझे खच्चीकरण करुन माझे मनोधर्य कमी करण्याचाच जास्त प्रयत्न करणारी मंडळी होती.आजपासून बरोबर तीस पस्तीस वर्षापुर्वी हे सगळं घडत होत.पण…मला तेव्हाच हुरुप,धाडस,हिंमत व प्रोत्साहन देण्याचे काम माझ्या दुसऱ्या गुरुने अर्थातच आशाताई बच्छाव यांनी केले.लोक काय म्हणतील याचा अजिबातच विचार करु नकोस.तुला जे योग्य वाटते ते करत रहा…हे गुरुरुपी आशाताई बच्छाव यांचे शब्द व दिलेले प्रोत्साहन माझ्या आयुष्याला कलाटणी देऊन गेले.मी फक्त संघर्ष करत राहिलो.आपल्याला पत्रकारिता क्षेत्रांत कार्यरत व्हायचे आहे.तेथेच आपले नाव करण्यासाठी धडपडायचे आहे ध्येयाने प्रेरीत होऊन व आशाताई बच्छाव यांनी दिलेल्या हिंमतीवरुन महाराष्ट्रातल्या अनेक नामांकीत वृतपत्रातून पत्रकारिता केली.महाराष्ट्रातल्या खुप सगळ्या शहरांना भेटी दिल्या.दुःखात असेल अडचणीत असेल, संकटात असेल तेव्हा आशाताई बच्छाव यांनीच धीर देऊन मोठ्या कौशल्याने त्यातून मार्ग काढून मला सन्मार्ग दाखविला.एखाद्या बेवारशी सारखे जीवन जगणाऱ्या माझ्या सारख्या सतत भटकंतीवर असणाऱ्या अवलियाला आशाताई बच्छाव यांनी सन २००३ साली युवा मराठा वृतपत्रांची संकल्पना सांगितली.अन ती लगेचच प्रत्यक्षात साकार करण्यासाठी धडपड सुरु झाली.बरोबर २० आँक्टोबर २००३ रोजी माझ्याच वाढदिवशी युवा मराठा नावाचे एक छोटसे रोपटे लावले.आज बघता बघता त्या रोपटयांचा वटवृक्ष झालेला आहे.हि सारी किमया आशाताई बच्छाव यांच्या अनमोल मार्गदर्शन व सततच्या प्रोत्साहनामुळे साकार झाली आहे.गुरु हा अखेर गुरुच असतो,तो लहान असो अथवा मोठा पण गुरु हा आपल्याला श्रेष्ठच असतो,आपल्या जीवनाला आकार देऊन आपले आयुष्य घडविणारा एका अर्थाने तो भगवंतच असतो.आशाताई बच्छाव यांना युवा मराठा वाढविण्यासाठी प्रसंगी पदरमोड करुन दागदागिने गहाण ठेऊन युवा मराठा वाढविला.युवा मराठाची “एकला चलो रे” ची चळवळ आज महाराष्ट्रभर लोकचळवळ म्हणून उभी करण्यात आशाताईंचा मोलाचा वाटा आहे.अशा या गुरुरुपी आशाताईचे कुठे तरी ऋण फेडण्याचे उद्देशाने सन २०२१ साली व-हाणे या आशाताईच्यांच गावी आश्रयआशा फाऊंडेशन हि संस्था त्यांच्या नावाला अनुसरुन स्थापन करण्यात आली,कुठे मी बेवारशासारखा भटकंती करीत होतो,निर्वासिताचे जीवन जगत असताना माझ्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी देणारा माझा दुसरा गुरु आशाताई बच्छाव या माझ्यासाठी दुसऱ्या भगवंतापेक्षा कमी नाहीत.आश्रय देऊन युवा मराठाचा पसारा मोठा करण्यात सहभाग दाखविला त्या गुरुवर्य आशा ताई बच्छाव यांच्या नावे आश्रयआशा फाऊंडेशन संस्था निर्माण करण्यात येऊन गुरुचे छोटसे ऋण फेडण्याचा हा अल्पसा प्रयत्न केला.
राजेंद्र पाटील राऊत
मुख्य संपादक युवा मराठा






