Home संपादकीय संपादकीय अग्रलेख.. कसले हे पुरस्कार अन कसले हे सत्कार?

संपादकीय अग्रलेख.. कसले हे पुरस्कार अन कसले हे सत्कार?

260
0

राजेंद्र पाटील राऊत

20230625_181254-BlendCollage.jpg

संपादकीय अग्रलेख..
कसले हे पुरस्कार अन कसले हे सत्कार?
वाचकहो,
एखाद्याला साक्षात्कार होतो अन मग मोठा चमत्कार घडतो.अगदी तसेच पण काहीसे चमत्कारिक म्हणावे लागेल अशाच घटना गत काही दिवसापासून व-हाणे ग्रामपंचायतीच्या बाबतीत घडायला लागल्या आहेत.ग्रामसेवक हेमंतकुमार शिरसाठ यांचा पायगुण म्हणायचा की,आणखी काही कर्तबगारी म्हणायची.पण…या ग्रामपंचायतीला बरेच काही पुरस्कार, सत्कार मिळताहेत.म्हणजे हा चमत्कार कसा घडला,हा देखील संशोधनाचा भाग ठरु शकतो.वास्तविक पुरस्कार घेण्यासाठी अथवा देण्यासाठी काही निकष ठरलेले आहेत.अगोदर आपली कर्तबगारी सिध्द करावी लागते.मगच असे पुरस्कार आपोआप मिळतात.मात्र व-हाणे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ.अनिता पवार यांना कालच एका वृतपत्राने लोकनेता म्हणून पुरस्कार दिला खरा.पण लोकनेता कशाला म्हणतात याची साधी खात्रीही पुरस्कार देणाऱ्या वृतपत्राने केल्याचे खरे तर दिसून येत नाही.वास्तविक ज्या व-हाणे गावात आज ऐन पावसाळ्यात सुध्दा घोटभर पाण्यासाठी नागरीकांना कासावीस व्हावे लागते.अशा एक ना नाना समस्यांनी ग्रासलेले व-हाणे हे महामार्गावरील गाव कसे पुरस्कार प्राप्त ठरते याचे अवलोकन सायंकाळी व सकाळी माय माऊल्या उघडयावर प्रातविधीला जातात तेव्हा सर्व्हक्षण करुन पुरस्कार दिला असता तर खुपच छान झाले असते.नाही तरी आजकाल पुरस्कारांची खैरात वाटण्याचा एक धंदा झाला आहे.मुठभर चंदा घेतला की कुणालाही पुरस्कार दिला जातो,मात्र त्यासाठी खरी कर्तबगारी व कामकाज पाहिले जात नाही हे दुर्दैव आहे,वरुन जसे दिसते तसे आतून काहिच नसते,अर्थात बडे घर का पोकळ वासा या उक्तीप्रमाणे व-हाणेत सगळे आलबेल सुरु आहे.मागच्याच महिन्यात या ग्रामपंचायतीला आय.एस.ओ.नामाकंन दर्जाचा पुरस्कार मिळाला.प्रत्यक्षात या ग्रामपंचायतीचा कागदोपत्री असलेला खोटा घोळ अजून संपलेला नाही,अन पुरस्कार देणाऱ्या संस्थाही खरे वस्तुनिष्ठ परिस्थितीचे अवलोकन करण्यापूर्वीच पुरस्कारांची खिरापत वाटत सुटले तर पुरस्कारांचे महत्त्व व किंमत कमी होते.असे आम्हांला तरी वाटते.व-हाणे सारख्या गावाचा कायापालट व्हावा व विकास व्हावा म्हणून स्वर्गिय लोकनेते तुकाराम (भाऊ) शंकर पवार माजी सभापती पं.स.मालेगांव यांनी अखेरच्या श्वासापर्यत प्रयत्न केलेत.ते खरे अर्थाने लोकनेते ठरतात.त्यानंतरच्या काळात व-हाणेत कुणी लोकनेता तयार झाला असे आम्हांला तरी वाटत नाही.लोकनेता याचा साधासोपा सरळ सरळ अर्थ लोकहिताची कामे करुन लोकांच्या हदयात व मनामनात घर करणारा खरे अर्थाने लोकनेता ठरतो.पण येथे तर सगळंच अघटीत घडतंय..गावाची वाटचाल बघितली तरी विकासाच्या नावाने ठणाणा गोपाळा आहे.मग कोणत्या नैतिकतेच्या आधारावर हे असे पुरस्कार स्वतः ची वाहवा करुन घेण्यासाठी कौतुकास्पद ठरतील? नाम बडे दर्शन खोटे या पध्दतीने ईमानदारीका का चोला पहननसे कोई इमानदार नही कहलाता.दुनिया सगळेच ओळखून असते.काय खरे अन काय खोटे! एक मात्र खरे की, ग्रामसेवक हेमंतकुमार शिरसाठ यांचा पायगुण व-हाणे गावाला खरोखरच भाग्याचा ठरला.गावाचा विकास फक्त कागदोपत्री झाला तरी चालेल.गावातील जनता तहानलेली रहिली तरी हरकत नाही,मायमाऊल्या उघडयावर शौचास गेल्यात तरी घंटा फरक पडत नाही.गाव अंधारात तडफडत राहिले तरी आम्हांला अजिबातच देणे घेणे नाही.पण…स्वतः चे कौतुक करुन घेण्यासाठी आपली स्वतः ची आपणच पुरस्कार घेऊन पाठ थोपटून घेण्यातच खरी धन्यता मानणारी व मर्दमुकी गाजविणारी व-हाणे ग्रामपंचायत हि बहुतेक महाराष्ट्रातील एकमेव ग्रामपंचायत असावी.हेच खरे!

Previous articleसमृद्धी महामार्गावर एका खाजगी बसला भीषण अपघात;
Next articleजन्म देणारी पहिला गुरु आई,जीवनाला दिशा देणारा दुसरा गुरु बच्छाव आशाताई!!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here