Home सामाजिक गुरु म्हणजे आपल्या आयुष्यरुपी सागराचा आरसा

गुरु म्हणजे आपल्या आयुष्यरुपी सागराचा आरसा

255
0

आशाताई बच्छाव

IMG-20230629-WA0074.jpg

गुरुपौर्णिमा विशेष —

गुरु म्हणजे आपल्या आयुष्यरुपी सागराचा आरसा

दैनिक युवा मराठा
लक्ष्मण आवारे चांदवड

गुरुंनी दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा गुरु कोण? आयुष्याच्या प्रत्येक वळणावर क्षणाक्षणाला सदमार्गावर नेतो तो गुरु. गुरू म्हणजे आपल्या आयुष्यरुपी सागराचा आरसा असतो जो तुम्हाला गुणांसह अविवेक अविचारी दोषांवर मात करण्याची ताकद देत असतो मनुष्याचे जीवन अति क्षणभंगुर आहे आपण पाहतो ना किती मोठे मोठे होऊन गेले राम कृष्ण दी अवतार झाले मोठे मोठे सत्पुरुष होऊन गेले कोणत्या ना कोणत्या निमित्ताने का होईना आज ते दिसेनासे झाले पण त्यांचे विचार शिकवण आजही आपण आचरणात आणतो दत्तगुरूंनी सांगितलेच आहे क्षणाक्षणाला आपल्याला शिकवण देतात ते गुरुच असतात त्यांच्यापासून चांगुलपणा सदसदविवेक बुद्धीचा बोध घ्यावा आपल्याला प्रपंचाशिवाय गत्यंतर नाही मनुष्य जन्माला येतो तो पराधीनतेत आणि जातोही पराधीनतेत जन्म मृत्यूच्या मधलं अंतर म्हणजे आयुष्य किती जगला याहीपेक्षा कसा जगला हे महत्त्वाचे आणि प्रपंच रुपी मोहमायात वावरत असताना त्याला परमार्थाची जोड द्यावया साक्षात परमेश्वर रूपी असतात ते म्हणजे गुरु आज गुरुपौर्णिमेनिमित्त आपण आपल्या गुरूंचे स्मरण पूजन करत असतो पण गुरूंनी दिलेली शिकवण ही केवळ एका दिवसाचा उत्सव नसावा तर ती रोजच्या जीवनात वावरत असताना माणूसपणाची जाण म्हणजेच गुरुदक्षिणा असावी गुरूंजवळ काय मागावे तर माझ्यासोबत तुम्ही असताना मज पामराला कशाची भीती तुझ मागणे काही न आता तुझा संग आशीर्वाद असावा . मनुष्य जन्माला आला म्हणजे त्याचा उद्धार होणारच पण अंतसमयी भवसागर पार करताना तुमच्या हाताला धरून नेतो तो गुरु कली युगात वावरत असताना अवतीभोवती कली मातत चालला आहे त्याचा अंतर्मनावर परिणाम होऊ नये म्हणून गुरू नामस्मरण करण्यास सांगतात साक्षात ईश्वर मनात स्मरणात मुखात असेल तर बाह्य प्रपंचांची उठाठेव नसते. व्यवहारात संगत तर सुटत नाही पण मन सज्ज तर राहावे असे वाटते त्यावेळी कोणतेही कार्य करत असताना भगवंताचे अनुष्ठान मनात असावे कारण नामसमरणाची ताकद वाम कार्यापासून परावृत्त करू शकते नामस्मरण मुखात असावे देवा तुझ्या इच्छेने काय मिळायचे ते मिळू दे जे आहे त्यात समाधान मानायचा प्रयत्न करावा आपल्या गुरूंना तुम्ही आम्ही दुःखी व्हावे असे कधीच वाटणार नाही गुरुंनी सांगितलेला उपदेश नामस्मरण आचरणात आणावे सर्वांनी आपला प्रपंच उत्तम करावा प्रपंचातील कर्तव्य विसरू नेये पण तो करत असताना गुरु शिकवण विसरता कामा नये व्यवहारात सुद्धा आपल्याला गुरु करावा लागतो तर त्याहीपेक्षा अवघड ज्ञान माहीत होण्यासाठी गुरु नको असे म्हणून कसे चालेल प्रपंचात सुखदुःख झाले समाधान मिळाले नाही तर मग सुख कुठे आहे आणि ते मला कोण दाखवील अशी ज्याला तळमळ लागेल तोच गुरु करेल शिकावे असे ज्याच्या मनात येते तो शिष्य आणि जो शिकवतो तो गुरु मला काही कळत नाही असे ज्याला वाटते तो गुरु करेल शास्त्रे आणि वेद अनंत आहेत ते शिकायला आपल्याला वेळ कुठे आहे पण ते समजून घ्यायला व्यावहारिक जीवनात आचरणात आणायला साथ देतात तेच गुरु या सांगड बांधा रे बांधा भक्तिचि हरिनाम नामाची या गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंनी दिलेली शिकवण माणूसपणाची जाण सद्भावना यासारख्या अनेक आशीर्वाद रुपी सेवांचा उत्कर्ष करू आपल्यासह इतरांचा भलं व्हाव अहंकाराचा वारा न लागो मनाला जी सेवा होते ती इर्षसेवा मानून गुरूंच्या चरणी नतमस्तक होत प्रपंचासह परमार्थही अंगीकारू.
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त

सौ स्मिता शेखर कुलकर्णी.
ब्राह्मण महासंघ विश्वस्त.

Previous articleमाझी गुरु “आई कौशल्या
Next articleप्रेरणादायी शिक्षण देणारे शिक्षक,आई वडील हेच विद्यार्थ्यांचे खरे आदर्श गुरुवर्य होय
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here