• Home
  • 🛑 दहावी, बारावीची फेरपरीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये 🛑

🛑 दहावी, बारावीची फेरपरीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये 🛑

🛑 दहावी, बारावीची फेरपरीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 20 ऑक्टोबर : ⭕ SSC-HSC Re-Exams 2020: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावी आणि बारावीची फेरपरीक्षा यंदा कोविड-१९ संक्रमण स्थिती आणि त्यामुळे पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे जुलै-ऑगस्टमध्ये झाली नव्हती. ती परीक्षा आता नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणार असल्याची घोषणा राज्य मंडळाने केली आहे. लाखो विद्यार्थी-पालकांना या घोषणेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. करोना संक्रमण संकट काळात राज्यात होणारी ही शालेय स्तरावरील पहिली मोठी परीक्षा असणार आहे.

ज्या विद्यार्थ्यांना या फेरपरीक्षेला बसायचे आहे, ते विद्यार्थी बोर्डाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत. अर्ज भरण्याच्या तारखा राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केल्या आहेत.

➡️ फेरपरीक्षा किंवा पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :-

⭕ नियमित शुल्कासह अर्ज करणे – २० ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर २०२०.

⭕ विलंब शुल्कासह अर्ज करणे – ३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२०.

जे विद्यार्थी अनुत्तीर्ण आहेत ते किंवा ज्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण असूनही श्रेणी सुधारायची आहे, असे सर्व विद्यार्थी ही पुरवणी परीक्षा देऊ शकतील. श्रेणीसुधारसाठी नोव्हेंबर-डिसेंबर २०२० आणि फेब्रुवारी-मार्च २०२१ अशा लगतच्या दोनच संधी उपलब्ध राहणार आहेत. नियमित शुल्कासह अर्ज भरण्याच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचेही राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.⭕

anews Banner

Leave A Comment