Home कोल्हापूर अतिग्रेचे घोडावत कोव्हिड सेंटर ग्रामिण भागास वरदान : महिला व बालकल्याण सभापती...

अतिग्रेचे घोडावत कोव्हिड सेंटर ग्रामिण भागास वरदान : महिला व बालकल्याण सभापती डॉ. पद्याराणी पाटील

125
0

राजेंद्र पाटील राऊत

अतिग्रेचे घोडावत कोव्हिड सेंटर ग्रामिण भागास वरदान : महिला व बालकल्याण सभापती डॉ. पद्याराणी पाटील

हातकणंगले / युवा मराठा न्युज नेटवर्क
महिला व बालकल्याण सभापती डॉ.पद्याराणी पाटील यांनी ग्रामिण भागास वरदान ठरलेले अतिग्रे घोडावत कोव्हिड सेंटर व माले अतिग्रे गावास भेट देऊन कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी आढावा बैठक घेतली आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आरोग्य सेवेस लागणारी औषधे उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.
हातकणंगले तालुक्यातीलअतिग्रे येथील घोडावत कोव्हिड सेंटरला जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती डॉ.पद्माराणी पाटील यांनी भेट देऊन सेंटरचे प्रमुख नोडल ऑफिसर डॉ.उत्तम मदने यांच्याशी सेंटरमधील वैद्यकिय सेवा,भौतिक सोयी सुविधा,औषध पुरवठा व अन्य अडीअडचणी बद्दल चर्चा केली.
अतिग्रे येथील घोडावत कोव्हिड सेंटर काही दिवसापूर्वी सुरू झाले आहे. या सेंटरमध्ये ३८० नॉन ऑक्सिजन बेडपैकी ३३० रुग्ण उपचार घेत आहेत व २०ऑक्सिजन बेडचे रूग्ण उपचार घेत आहेत. या सेंटरमध्ये बारा डॉक्टर ,सोळा सिस्टर , चार हाऊस किपींग कर्मचारी व आठ वॉर्डबॉय सेवा बजावत आहेत. सेंटरमधील रुग्णांच्या संख्येचा विचार केला असता सात डॉक्टर, वीस हाऊसकिपींग कर्मचारी, वीस वॉर्ड बॉयची आवश्यकता आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रुग्णांच्या उपचारासाठी अधिकाधिक औषध पुरवठा होणे तसेच ऑक्सिजन मात्रा वाढवणे आवश्यक आहे. पुढील काही दिवसामध्ये शंभर ऑक्सिजन बेडची सुविधा देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून लवकरच हा आरोग्य सेवा प्रकल्प पूर्णत्वास येईल. अशी माहिती डॉ. उत्तम मदने यांनी सभापती डॉ.पद्याराणी पाटील यांना दिली.
माले अतिग्रे येथील ग्रामपंचायत व कोरोना सनियंत्रण ग्रामसमितीस सभापती डॉ.पद्याराणी पाटील यांनी भेट देऊन गावातील कोरोना संसर्ग रोखून गावे कोरोना मुक्त होण्यासाठी उपाययोजना बद्दल मार्गदर्शन केले. तसेच गावपातळीवर आरोग्य सेवा यंत्रणा कार्यान्वीत करण्याचे आवाहन केले.
फोटो कॅप्शन
अतिग्रे येथील घोडावत कोव्हिड सेंटरमध्ये
नोडल ऑफिसर डॉ. उत्तम मदने यांच्याशी चर्चा करून पाहणी करतांना महिला व बालकल्याण सभापती डॉ.पद्याराणी पाटील

Previous articleराज्याला पंधराव्या वित्त आयोगातून 861 कोटी रुपयांचा निधी प्राप्त – ना. हसन मुश्रीफ
Next articleआमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत covid-19 च्या निधीतून वडगांव पालिकेला शववाहिका
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here