राजेंद्र पाटील राऊत
आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत covid-19 च्या निधीतून वडगांव पालिकेला शववाहिका
पेठ वडगांव : (मोहन शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क कोल्हापूर)- सध्या कोल्हापूर जिल्ह्यासह पेठ वडगांव शहरात व परिसरात कोरोनाचा चा प्रादुर्भाव वाढलेने नागरिकांच्या कडून शव वाहीकेची मागणी होती त्यास अनुसरून माननीय नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व सर्व सन्माननीय नगरसेवक यांनी माननीय नामदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील साहेब पालकमंत्री यांचेकडे पाठपुरावा केलेने माननीय नामदार श्री. सतेज उर्फ बंटी- डी. पाटील-साहेब पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा यांनी आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत covid-19 च्या निधीतून वडगाव नगर परिषदेस रक्कम रुपये 14 लाख 50 हजार इतक्या रकमेची शववाहीका मंजूर केली. ती आज वडगाव नगरपरिषद तिकडे सुपूर्द करण्यात आली यावेळी नगराध्यक्ष श्री. मोहनलाल माळी साहेब तसेच नगरसेवक श्री.शरद पाटील नगरसेविका सौ. शबनम मोमीन, नगरसेवक श्री.दशरथ पाटील तसेच अभिनंदन सालपे इत्यादी उपस्थित होते.




