Home मुंबई अरुण गवळीची दगडी चाळ होणार इतिहासजमा; म्हाडा उभारणार ४० मजली टॉवर 🛑

अरुण गवळीची दगडी चाळ होणार इतिहासजमा; म्हाडा उभारणार ४० मजली टॉवर 🛑

132
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 अरुण गवळीची दगडी चाळ होणार इतिहासजमा; म्हाडा उभारणार ४० मजली टॉवर 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕अंडरवर्ल्ड डॉन ते राजकारण असा प्रवास करणाऱ्या अरुण गवळीचं मुंबईतील निवास्थान म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या दगडी चाळीचा पुनर्विकास केला जाणार आहे. म्हाडाचे मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्विकास मंडळ (MBRRB)अध्यक्ष विनोद घोसाळकर यांनी ही माहिती दिली आहे. दगडी चाळमधील सर्व १० इमारतींचा पुनर्विकास होणार आहे. यामधील आठ इमारती अरुण गवळीच्या मालकीच्या असून इतर दोन इमारतीही त्याच्या कुटुंबाने विकत घेतल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
पुनर्विकासासाठी लवकरच बिल्डरला ना हरकत प्रमाणपत्र दिलं जाईल. दरम्यान भाडेकरुंसाठी इरादा पत्र मंजूर झालं आहे. त्याआधी एमबीआरआरबी पात्र भाडेकरुंची यादी तयार करणार आहे,” असंही घोसाळकर यांनी सांगितलं आहे.

प्राथमिक योजनेनुसार दगडी चाळीच्या जागी ४० मजली दोन टॉवर उभारण्यात येणार आहेत. यामध्ये मूळ भाडेकरुंसाठी घरं असतील आणि उर्वरित घरं विक्रीसाठी उपलब्ध असतील. दगडी चाळीत एकूण ३३८ भाडेकरु असून अरुण गवळी संपत्तीचा मालक आहे. अरुण गवळीने पुनर्विकासाठी म्हाडाकडे प्रस्ताव पाठवला होता.

कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर म्हाडाकडून प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
अरुण गवळीची दगडी चाळ होणार जमीनदोस्त
“सध्या एमबीआरआरबीला या प्रकल्पात किती घऱं मिळतील हे निश्चित नाही. इरादा पत्र हे फक्त पहिलं पाऊल आहे. नंतर यामध्ये अनेक बदल होण्याची शक्यता आहे,” असं घोसाळकर यांनी सांगितलं आहे. १० इमारतींमध्ये प्रत्येकी चार मजले असून यामधील दोन इमारती धोकादायक असल्याने आधीच पाडण्यात आल्या आहेत. यामुळे प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत त्या मोकळ्या जागेत भाडेकरुंसाठी तात्पुरती राहण्याची सोय केली जाईल.

अरुण गवळीमुळे दगडी चाळ प्रसिद्ध असून शिवेसना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी सध्या तो जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

त्याला नागपूर जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. दरम्यान पत्नीची प्रकृती ठीक नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एप्रिल महिन्यात त्याला ४५ दिवसांचा पॅरोल मंजूर केला होता.⭕

Previous articleआमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत covid-19 च्या निधीतून वडगांव पालिकेला शववाहिका
Next article🛑 पुण्याच्या मुलाने चंद्राचा आजवरचा सर्वात सुस्पष्ट फोटो मिळवलाय…त्याने हे कसं शक्य केलं…? 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here