Home बुलढाणा अखेर संग्रामपूर तालुक्यात रेती माफियांवर कार्यवाहीला सुरुवात

अखेर संग्रामपूर तालुक्यात रेती माफियांवर कार्यवाहीला सुरुवात

54
0

आशाताई बच्छाव

IMG-20220609-WA0018.jpg

अखेर संग्रामपूर तालुक्यात रेती माफियांवर कार्यवाहीला सुरुवात
ब्युरो चीफ स्वप्नील देशमुख सह
ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी

संग्रामपूर :- तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर कार्यवाहीला सुरुवात. तहसीलदार वरणगावकर यांच्या मार्गदर्शनात प्रभारी नायब तहसीलदार हरिभाऊ उकर्डे यांच्या पथकाने आज दिनांक 9 जून 22 रोजी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान वरवट बकाल येथील तलाठी कुसळकर यांच्या कार्यालयाच्या जवळ अवैद्य रेती वाहतूक करणारे टिप्पर पकडले असता वाहन चालकाला रॉयल्टी विचारली परंतु रॉयल्टी आढळून आली नसुन सदरचे MH 28 BB 1640 क्रमांकाचे (407)वाहनाचा पंचनामा करून वाहन पोलीस स्टेशन तासगाव येथे लावण्यात आले व पुढील दंडात्मक कारवाई करिता तहसीलदार यांच्या कडे प्रकरण दाखल करण्यात आले सदर कारवाई ही प्रभारी नायब तहसीलदार उकर्डे यांच्यासोबत तलाठी गाळे, खेळळकर ,खरे यांच्या पथकाने केली .तसे पाहता बरेच दिवसांनी म्हणजे मंडळ अधिकारी उकर्डे यांच्याकडे प्रभारी नायब तहसीलदार म्हणून अतिरिक्त प्रभार आला तेव्हापासून तालुक्यात त्यांच्या व्यतिरिक्त रेती तस्करांवर कोणीही कार्यवाही करण्यास पुढे होत नसल्याने उकर्डे यांना तहसील कार्यालय येथे वेळ द्यावा लागत असल्यामुळे रेती माफियांना रेती उत्खनन व वाहतूकी करीता सुवर्णसंधी मिळाल्यासारखेच झाले होते.म्हणुन अवैद्य रेती चोरी मुळे पर्यावरणाची हानी व शासनाचे राजरोसपणे होणारे नुकसान थांबवण्यासाठी अखेर दबंग मंडळ अधिकारी तथा प्रभारी नायब तहसीलदार हरिभाऊ उकर्डे यांनाच मैदानात उतरून रेती माफियांवर कार्यवाहीला सुरुवात करावी लागली. परंतु विशेष म्हणजे वरील वाहनावर कार्यवाही चालू असतानी इतरत्र रेती माफियांची पळापळ झाली.
..?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here