• Home
  • 🛑 आधार कार्ड लिंकसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत 🛑

🛑 आधार कार्ड लिंकसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत 🛑

🛑 आधार कार्ड लिंकसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

पुणे -⭕राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी व रोजगाराच्या प्रशिक्षण आणि स्वयंरोजगाराच्या संधी प्राप्त करण्यासाठी बेरोजगार उमेदवारांनी त्यांच्या नोंदणीला आधार कार्ड लिंक करून आपला डेटा अद्ययावत करणे आवश्‍यक आहे. यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत आहे.

पुणे जिल्ह्यातील नोकरीसाठी सेवायोजन कार्यालयाकडे नावनोंदणी केलेल्यांना त्यांच्या नोंदणीला आधार कार्ड लिंक करण्याबाबत वारंवार सूचना दिल्या. मात्र अद्यापही बहुसंख्य उमेदवारांनी त्याची अंमलबजावणी केलेली नाही.

सर्व उमेदवारांनी मुदतीत ही प्रक्रिया www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाइटवरून पूर्ण करणे बंधनकारक आहे.

anews Banner

Leave A Comment