• Home
  • 🛑 जेष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांच्या मुलाचे निधन 🛑

🛑 जेष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांच्या मुलाचे निधन 🛑

🛑 जेष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांच्या मुलाचे निधन 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

मुंबई :⭕प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवाल यांचे वयाच्या ३५ व्या वर्षी निधन झाले आहे. दीर्घकाळापासून ते मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांचे मूत्रपिंड निकामी झाल्याने आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. आदित्य पौडवालच्या पश्चात आई अनुराधा पौडवाल आणि गायिका बहीण कविता पौडवाल असा परिवार आहे. गेल्या काही महिन्यात अनेक प्रसिद्ध कलाकारांच्या निधानातून बॉलिवूड आणि चाहते सावरले नसताना आणखी एक धक्का बसला आहे.

म्युझिक अरेंजर, संगीतकार म्हणून आदित्यने संगीत विश्वात स्वतःची ओळख निर्माण केली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपटातील ‘साहेब तू’ या गाण्याचा प्रोड्युसर म्हणूनही त्याने काम केले होते.

‘अरुण पौडवाल आणि अनुराधा पौडवाल खूप गप्पिष्ट. पूर्वी खारच्या त्यांच्या घरी जाणे झाले की हा छोटासा आदित्य छान हसून स्वागत करणार. त्यानेही संगीत वारसा जपला.. आज वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी त्याच्या जाण्याचे वृत्त प्रचंड धक्कादायक. दुर्दैव’, अशा शब्दात प्रख्यात सिने अभ्यासक दिलीप ठाकूर यांनी आठवणी जागवल्या आहेत….⭕

anews Banner

Leave A Comment